AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करावे, शेलारांचा टोला

आमदारांसह मुख्यमंत्र्यांनीही आता खरच आत्मचिंतन गंभीरपणे केलं पाहिजे. तशी वेळ आली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)साखरझोपेत असल्याचे ते म्हणाले.

Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करावे, शेलारांचा टोला
12 आमदारांना विधानसभेत प्रवेश द्या, आशिष शेलारांचं विधानभवन सचिवांना पत्र
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : शिवसैनिकांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनीही आता खरच आत्मचिंतन गंभीरपणे केलं पाहिजे. तशी वेळ आली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी केली आहे.

‘निधी मिळत नाही?’ महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi Government)वर टीका करताना पुढे ते म्हणाले, आमच्याशी चर्चा करताना छाती फुगवून अर्धी संधी, अर्धी पद हे सगळे बोलत होते. तर मग आता काय झाले, तुम्ही सत्तेत असतानासुद्धा तुमच्या मंत्र्यांच्या खात्याला निधीच मिळत नाही आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणतात आमच्यामुळे सरकार आहे. याचा विचार त्यांनीच करावा, असे ते म्हणाले.

‘420 कोटीवर भाष्य करत नाही’ किमान आदित्य ठाकरे यांचा तरी या सरकारने विचार करायला हवा होता, एक युवा नेतृत्व काम करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात किती होत आहे, हा भाग वेगळा, पण किमान त्यांचा तरी सन्मान करायला हवा होता, असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरें(Aditya Thackeray)ना लगावला.

‘सर्वात कमी अधिवेशन घेण्यारे सरकार’ अधिवेशनच होत नाही. त्यामुळे प्रगतीपुस्तक काय मांडणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्राचे अधिवेशन पूर्ण होते, मग महाराष्ट्रात का नाही? हे दुर्दैव आहे. सर्वात कमी अधिवेशन घेण्यारे सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल, अशी टीका त्यांनी केली.

‘खोट्या गोष्टी दाखवल्या जात आहेत’ माझा शब्द अंडरलाईन करा, हे सरकार साखरझोपेत आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात कुणी मंत्री आहेत का? हे सरकार संपूर्णपणे हरवले आहे, असे चित्र आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. मुंबई महापालिकेने 2020पासून लपवलेले मृत्यू आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ, फक्त चांगले आहे ते निवडून घेत त्यावर आपल्या कामाचा डोलारा उभा करण्याचा हा प्रकार आहे. सोशल मीडियातून इमेज बनवत खोट्या गोष्टी दाखवल्या जात आहेत, असा घणाघात शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

OBC Reservation: इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नका; पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Elections: 106 नगर पंचायती आणि दोन जिल्हा परिषदेच्या स्थगित निवडणुका, अखेर पुढच्या वर्षीचा मुहूर्त

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करू नका; अन्यथा तीव्र आंदोलन, प्रशांत बंब यांचा इशारा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.