AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: ठाकरे सरकार म्हणजे अहंकार… अहंकार… अहंकार असलेलं सरकार; आशिष शेलारांचा घणाघात

राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे सरकारमधील नेत्यांनी सरकारच्या कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे.

VIDEO: ठाकरे सरकार म्हणजे अहंकार... अहंकार... अहंकार असलेलं सरकार; आशिष शेलारांचा घणाघात
ashish shelar
| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 3:26 PM
Share

मुंबई: राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने दोन वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे सरकारमधील नेत्यांनी सरकारच्या कामाची जंत्री सादर करायला सुरुवात केली आहे. तर भाजपकडून सरकारच्या कामाचा पंचनामा सुरू आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार म्हणजे अहंकार… अहंकार… अहंकार असलेलं सरकार आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला करतानाच सरकारच्या कामाचा पंचनामा केला. मी मंत्रालयात येणार नाही, मी अधिवेशन घेणार नाही. माझ्यापक्षा विषयी बोललात तर मुंडण करू, केंद्रीय मंत्री असलात तरी मुसक्या बांधून अटक करेल, असे म्हणणारे हे अहंकारी सरकार आहे. माझा उल्लेख चुकीचा केला म्हणून जुनी बंद झालेली केस ओपन करुन संपादकाला अटक करेन, असा फक्त अहंकार, अहंकार आणि अहंकार असलेले सरकार हे सरकार आहे, असं शेलार म्हणाले.

लोकशाहीला मारक निर्णय का घेतले जातात?

या सरकारने सामान्य माणसाचे भले केले नाही. अहंकार,अतर्क,असंवेदनशील कार्यपद्धती सरकारची दोन वर्षे राहिली. पेट्रोलवरील कर कमी करा अशी मागणी केली तर विदेशी दारुवरील कर कमी केला. वायनरीला सबसिडी दिली. पण शेतकऱ्यांबाबत काही बोलायला तयार नाही. वीस वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाचा एका एजन्सीला पैसा दिला गेला. पण एसटीच्या कामगाराला द्यायला तयार नाहीत. रयत शिक्षण संस्थेला करोडो दिले जातात, आमचा विरोध नाही. पण शाळांना अनुदान दिले जात नाही. शाळा बंद मात्र फी वाढवली जाते. सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचे बंद केले जाते. शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क काढून घेतला जातो. लोकशाहीला मारक असे हे निर्णय का घेतले जातात? हे सगळे तर्कात न बसणारे आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.

न्यायालयाने वारंवार फटकारले

यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या मुद्द्यावरूनही सरकारला धारेवर धरले. 16 हजार ग्रामपंचायत प्रशासक म्हणून स्वतः ची लोक बसवण्याचा डाव सरकारचा होता, पण हा डाव न्यायालयाने फेटाळला. ‘कोरोना काळात स्थलांतरीत कामगारांची काय सोय केली, असे म्हणत न्यायालयानं सरकारला फटकारलं. कोर्टाने या सरकारचं प्रतिज्ञापत्रच स्विकारल नाही. अंतिम वर्षे परीक्षा न घेण्याच्या निर्णयावरुनही सरकारला न्यायालयाने फटकारुन परीक्षा घ्यायला लावल्या. पीएमआरडीच्या थेट नियुक्ती रद्द करुन निवडणूक घ्यायला लावली, अशा असंख्य निर्णयात न्यायालयाने सरकारला धारेवर धरल. कधी निर्णय रद्द केले, कधी मागे घ्यायला लावले, कधी कान उघडणी केली. सरकारचे निर्णय कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते. सरकारची वाटचाल असनदशीर मार्गवरची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

वेदनांचं प्रगटीकरण करण्याचा दिवस

मला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही. तसेच आज कोणता आरोप अथवा टीका ही करायचा नाही. आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या दोन वर्षापासून भोगाव्या लागल्या. त्या मांडत आहोत. काही वर्षांपूर्वी तीन पैशांचा तमाशा असं नाटक प्रसिद्ध होतं. हे सरकार म्हणजे तीन पैशांचा तमाशा असंच आहे. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी अमानवी, अमानुष प्रयत्न केला गेला. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या याभोवती केंद्रित झालेलं आहे. ही वेदना आम्ही मांडतो आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

राज्यात महाघोटाळा आघाडी, सोमय्यांचा घणाघात; 29 वा नंबर मालिकांचा असू शकतो, असा इशारा

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजितदादांचे जोरदार आसूड

अमोल इघे खून प्रकरणी नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव, दरेकरांचा आरोप; विधिमंडळात आवाज उठवणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.