“उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील”

ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे 12 नेते माझ्याविरोधात एकटवले होते. | Kirit Somaiya

उद्धव ठाकरे साहेब तुमची गाठ माझ्याशी आहे, इथले सगळे हिशेब द्यावेच लागतील
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 4:17 PM

मुंबई: नाईक कुटुंबीयांना पुढे करुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) हे पैशांची अफरातफर करत आहेत. परंतु, उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. मी नाईक कुटुंबीय आणि ठाकरे यांचा जमीन घोटाळा बाहेर काढला तेव्हा शिवसेनेचे 12 नेते माझ्याविरोधात एकटवले होते. मात्र, आता हे सगळे कुठे गेले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. (BJP Leader Kirit Somaiaya accusations on CM Uddhav Thackeray and Rashmi Thackeray)

अन्वय नाईक यांची पत्नी आणि मुलीने गुरुवारी पत्रकारपरिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी फटकारले होते. किरीट सोमय्या ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांच्यात झालेल्या जमीन व्यवहारात इतका रस का घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा टीकेची तोफ डागली. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. नाईक कुटुंबीय जमिनीची खरेदी-विक्री हा आमचा व्यवसाय असल्याचा दावा करत आहेत. ही गोष्ट चांगली आहे. पण ठाकरे कुटुंबाचाही हाच धंदा आहे, याविषयी कोणीही बोलत नाही. नाईक परिवाराला पुढे करून ते पैशांची अफरातफर करत असतील तर मला बोलावेच लागेल. ज्याने कोणी चोरीचा पैसा घेतला आहे तो परत द्यावाच लागेल. उद्धव ठाकरे यांची गाठ किरीट सोमय्याशी आहे. त्यांना सगळे हिशेब द्यावेच लागतील, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

रश्मी ठाकरेंशी पार्टनरशीप आहे का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारावरुन भाजपकडून होणाऱ्या आरोपांसंदर्भात नाईक कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच थेट उत्तर देण्यात आले. मुळात हा व्यवहार आठ ते दहा वर्षांपूर्वीचा आहे आणि जमीन खरेदी किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे का? या व्यवहाराचा आणि अन्वय नाईक मृत्यूप्रकरणाचा संबंध आत्ताच का जोडला जात आहे, असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीने केला.

माझे वडील हे वास्तूविशारद (आर्किटेक्ट) होते. त्यांनी कित्येक नेत्यांना जमिनी विकल्या असतील. अगदी शेवटपर्यंत ते प्लॉटिंग करुन जमिनी विकायचे काम करत होते. यामध्ये गैर ते काय आहे? भाजप नेत्यांकडून आरोप होत असलेल्या जमिनीच्या सर्व सातबाऱ्यांची माहिती द्यायला आम्ही तयार आहोत. अगदी आमच्या बँकेचे तपशीलही आम्ही सादर करु, असे आज्ञा नाईक यांनी सांगितले होते.

‘किरीट सोमय्यांचा जीव वर-खाली का होतो?’

याप्रकरणात आमची दोन माणसं गेली आहेत, म्हणून आमचा जीव वर-खाली होतो. तर अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे ते आमच्यावर आरोप करतात. मात्र, याप्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जीव इतका वर-खाली का होत आहे, याचे कारण आम्हाला अद्याप समजलेले नाही, असे आज्ञा नाईक यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

फडणवीसांना CDR मिळतो, मग आम्हाला का नाही? देवेंद्र फडणवीस दिशाभूल करतायत, नाईक कुटुंब संतापलं

रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार!, किरिट सोमय्या यांचा दावा

ठाकरे-वायकरांनी किती जमिनी एकत्रित खरेदी केल्या?; जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का?; सोमय्यांचा सवाल

(BJP Leader Kirit Somaiaya accusations on CM Uddhav Thackeray and Rashmi Thackeray)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.