बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले….

हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत | balasaheb thackeray

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:17 PM, 23 Jan 2021
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले....

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray birth anniversary) माजी शिवसैनिक आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Narayan Rane tweet on Balasaheb Thackeray jayanti)

नारायण राणे यांच्याशिवाय राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

हिंदुत्व आणि शुद्ध भगवा या मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray birth anniversary) केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’, असा केला आहे. त्यामुळे आता भगव्यापाठोपाठ आता भाजप बाळासाहेबांच्या वारश्यावरही आपला हक्क सांगणार का, अशी शंका उत्पन्न झाली आहे.

‘राजकारणात एखादी भूमिका घेतली म्हणजे बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला असं होत नाही’

राजकारणात एखादी भूमिका घेतली म्हणजे लगेच बाळासाहेबांच्या भूमिकेला छेद दिला असे होत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. हा आमच्यासाठी जन्मदिवस, जयंती नाही. पक्षभेद जातीभेद विसरून मराठी माणूस एकत्र येत आहे. ठाकरे आणि पवार ब्रँड एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी चांगलं घडतंय, अशी प्रतिक्रिया संजय राऊत व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

आमचे मार्गदर्शक…. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ ट्विटची चर्चा

Balasaheb Thackeray Statue | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

 मराठी माणूस ते हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये काय काय बदललं?

(Narayan Rane tweet on Balasaheb Thackeray jayanti)