AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘यापुढे त्यांनी असं केलं तर…’, भाजप नेत्याचा मनोज जरांगे यांना मोठा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरुन आता भाजप नेतेदेखील आक्रमक होताना दिसत आहेत. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फडणवीसांवर केलेल्या आरोपांवरुन मोठा इशारा दिला आहे.

'यापुढे त्यांनी असं केलं तर...', भाजप नेत्याचा मनोज जरांगे यांना मोठा इशारा
मनोज जरांगेImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Feb 26, 2024 | 2:58 PM
Share

मुंबई | 26 फेब्रुवाराी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता सत्ताधारी आमदारांकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. “मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचं आहे. आम्ही फडणवीस यांचा एकेरी उल्लेख सहन करू शकत नाही. यापुढे त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल”, असा इशारा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिला. “जरांगे पाटील हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत. रोज उठतात आपली भूमिका बदलतात. रोज आजारीपणाचं नाटक करतात. मला असं झालं. मला तसं झालं. मुंबईच्या दिशेने निघतात. पुन्हा युटर्न घेतात आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात. हे साफ चुकीचं आहे. समाज याला खपवून घेणार नाही”, असं प्रसाद लाड म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस हे एकटेच ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कायम मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ही सल कुठेतरी मराठा समाजातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टोचते. त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले जातात”, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. “जरांगे पाटील हे शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार राजेश टोपे यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत. त्यांचे जे मुद्दे असतात तेच मुद्दे जरांगे पाटील यांचे देखील असतात. त्यामुळे यामागे आमचा थेट आरोप शरद पवार यांची ते तुतारी वाजवत आहेत, असा आहे”, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला.

‘हे खपवून घेतलं जाणार नाही’, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

शिवसेना नेते भरत गोगावले यांनीदेखील मनोज जरांगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “मनोज जरांगे पाटील यांना आम्हाला एवढेच सांगायचं आहे की त्यांनी आता तरी थांबावं. आता दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलंय. आम्ही देखील मराठा आहोत. हे आरक्षण पुढे कोर्टात कायदेशीर लढा कसा देता येईल याबद्दल त्यांनी सरकार समोर बसून चर्चा करायला हवी. पण रोज उठसूठ उठायचं, आंदोलन करायचं, उपोषण करायचं, सरकारला अपशब्द बोलायचं हे खपवून घेतलं जाणार नाही. हे साफ चुकीचं आहे”, अशी भूमिका भरत गोगावले यांनी मांडली.

विरोधी पक्षाचे नेते जे काय बोलतात ते हास्यास्पद आहे. सरकारमधले नेते त्यांचे जीव घेण्याचा प्रयत्न करतील का? ते मराठा समाजासाठी लढत आहेत. ते मराठ्यांचे नेते आहेत.पण त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. ते साफ चुकीचं आहे, असं भरत गोगावले म्हणाले. “काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात त्यांना देखील माहित नाही. बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांमध्ये काही दम नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देणे योग्य देखील ठरणार नाही”, असं भरत गोगावले म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.