मी गायब होणारा नेता नाही, मुंबै बँक घोटाळ्यातील आरोपांवरुन दरेकरांनी विरोधकांना ठणकावलं

Pravin Darekar | एक वर्तमानपत्र आणि एकाच वृत्तवाहिनीवरुन मुंबै बॅंकेबद्दल वारंवार बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र, कोण काय लिहतंय किंवा बातम्या दाखवतंय यापेक्षा बँकेचे सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे.

मी गायब होणारा नेता नाही, मुंबै बँक घोटाळ्यातील आरोपांवरुन दरेकरांनी विरोधकांना ठणकावलं
प्रविण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 02, 2021 | 9:30 PM

मुंबई: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँक घोटाळ्यासंदर्भात विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना भाजप नेते प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरु झाली म्हणून प्रविण दरेकर (Pravin Darekar) गायब झाले, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, प्रविण दरेकर हा गायब होणार नेता किंवा कार्यकर्ता नाही, अशा शब्दांत प्रविण दरेकर यांनी विरोधकांना ठणकावले. (BJP leader Pravin Darekar on mumbai bank scam)

ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. या पत्रकारपरिषेदला मुंबै बँकेचे सर्व पदाधिकारीही उपस्थित होते. एक वर्तमानपत्र आणि एकाच वृत्तवाहिनीवरुन मुंबै बॅंकेबद्दल वारंवार बातम्या दाखवल्या जात आहेत. मात्र, कोण काय लिहतंय किंवा बातम्या दाखवतंय यापेक्षा बँकेचे सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आज खरी बाजू मांडण्यासाठी आपण पत्रकारपरिषद घेतल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.

मुळात मुंबै बँकेत 123 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बातमी कुठून आली ते कळू द्या. फक्त राजकीय सुडपोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. प्रकाश सोळंकी यांनी जाणीवपूर्वक चौकशी लावून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रकाश सुर्वेही राजकीय सुडापोटी आरोप करून काही हाती लागतंय का, हे बघत आहेत. पण यामधून काहीच साध्य झाले नाही, असे प्रविण दरेकर यांनी म्हटले.

प्रविण दरेकर यांच्या पत्रकारपरिषदेतील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:

• आमची बॅंक ही अ वर्ग असणारी • ज्या पिटीशन आहेत त्या कोर्टाने डिसमिस केलेले आहेत आपल्याकडे न्यायव्यवस्थेच्या पलीकडे काही नाही. • मजूर संस्थांना सभासद करणं आणि किती जणांना सभासद करणं याबाबत नियम नाही. • मी इतरांना जसा विरोध करतो तसा मी कोणत्याही चौकशीला घाबरत नाही

• ज्या भावनेतून जी चौकशी होईल त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे • राज्याचा विरोधी पक्षनेता असल्यान मला दबावात आणून मला अडचणीत आणत आहेत • जेवढे अडचणीत आणाल तेवढा जास्त मी आक्रमक पणे प्रश्न मांडत राहिल. • एका चॅनेलवर आम्ही अब्रू नुकसानीचा दावा टाकला आहे मुंबई बॅंके चा गोलमाल असा कंटेंट चालवला त्या बद्दल आमची माफी मागावी • अब्रू नुकसानीचा खटला दाखल करण्याचा निर्णय मुंबई बँकेने घेतला आहे यासंदर्भात नोटीस त्यांना जाईल. • विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा आमच्या मुंबई बँकेचे कौतुक झालेलं आहे • नाबार्डने देखील आमचं कौतुक केलं आहे. • तुम्ही बातम्या चालवल्या पण आर्थिक संस्थेची बदनामी होत आहे • ज्यांनी या बँकेवर भरभरून विश्वास ठेवला त्याप्रकारे आमच्यावर विश्वास ठेवावा. • मी कोणत्याही दबावाला मी घाबरत नाही भीक घालत नाही एक काय 100 वेळा चौकशी करा • जरंडेश्वर साखर कारखान्याची बातमी काल पासून सुरू आहे आमचे देखील 100 कोटी रुपये त्यांच्याकडे आहे

मुंबै बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरु झाला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाने सी समरी अहवाल सादर केला होता. हा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांच्या ४७ व्या न्यायालयाने फेटाळत पुनर्तपासाचे आदेश दिले. त्यानुसार आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढल्याचे सांगितले जाते.

मुंबै बँकेत १२३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप आहेत. मुंबै बँकेचे अध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

संबंधित बातम्या:

प्रवीण दरेकरांमुळे पुन्हा चर्चेत आलेलं मुंबै बँक घोटाळा प्रकरण काय आहे?, काय आहेत दरेकरांवर आरोप; वाचा स्पेशल रिपोर्ट

मुंबईतील ‘या’ दोन बड्या सहकारी बँकांवर RBI ची मोठी कारवाई

(BJP leader Pravin Darekar on mumbai bank scam)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें