रक्तदानाचा महायज्ञ! BAPS चा सेवा, मानवता, समर्पणाचा मंत्र,गरजूंना होणार मदत
BAPS Blood Donation : बीएपीएसने रक्तदानाचा महायज्ञ घडवला. शेकडो स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे या रक्तदान शिबीरात रक्तदान केले. आता गरजूंना या मानवी आधाराची मदत होईल.

बीएपीएस स्वामिनारायण संस्थेने (Bochasanwasi Akshar Purushottam Swaminarayan Sanstha – BAPS) पुन्हा मानवी गुणाचे दर्शन घडवले. रक्तदानाचा महायज्ञ घडवला. शेकडो स्वयंसेवकांनी या रक्तदान शिबीरात रक्तदान केले. निस्वार्थ,संघटित आणि मानवी भावनेतून रक्तदान शिबीरत रक्तदात्यांनी रक्तदान केले. भूकंप, दुष्काळ, रेल्वे दुर्घटना, युक्रेन-रशिया युद्ध यासारख्या संकटात प्रत्येक वेळी बीएपीएसने धैर्य,करुणा आणि शिस्तीने समाजसेवा केली आहे. या संघटनेच्या मदतकार्यात वर्गवाद, समाजिकवाद, जाती, धर्मवादाच्या भिंती गळून पडतात. बीएपीएस अनेक ठिकाणी तत्परतेने धावून जाते. मानवतेची सेवा करते.
जीवदानाचा महान यज्ञ-रक्तदान
बीएपीएसने मुंबई, नाशिक आणि पुण्यात आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये सेवा आणि मानवतेसाठी रक्तदानाचा महायज्ञ घडवून आणला. या रक्तदान शिबिरात आयोजक आणि स्वयंसेवकांनी 11,47,600 सीसी रक्त संकलीत केले. हा एक विक्रमच म्हणावा लागेल. अनेकांचे जीवन वाचवणाऱ्या या सेवा संकल्पात हिरारीने अनेकांनी सहभाग नोंदवला.
परम पूज्य महंत स्वामी महाराज यांच्या प्रेरणेतून हजारो स्वयंसेवक आणि श्रद्धाळूंनी या पुण्य कार्यात खारीचा वाटा उचलला. केवळ वैद्यकीय मदत म्हणून नाही तर आत्म्याची सर्वोच्च सेवा म्हणून रक्तदानाचा महायज्ञ घडला. रक्त हा एक मौल्यवान घटक आहे. तो सध्या तरी कोणत्याही प्रयोगशाळा अथवा तंत्रज्ञानाआधारे तयार होत नाही. त्यामुळे जगभरातील लाखो गरजू लोकांना या रक्ताची शिदोरी वेळेवर पोहचणार आहे. त्यांचे प्राण वाचणार आहे. त्यांना वेळीच रक्त मिळणार आहे.
स्वयंसेवकांचा समर्पण भाव
स्वयंसेवकांचा समर्पण भाव यावेळी दिसून आला. हजारो बीएपीएस स्वयंसेवकच या चळवळीचा आत्मा आहेत. त्यांची शिस्त, नम्रपणा आणि समर्पण हे या संस्थेच्या जीवंतपणाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. डॉ. श्री पुरी (SBTC संचालक) आणि डॉ. किशोर कुमार झा (महात्मा गांधी ब्लड बँक संचालक) यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तशिबीर झाले. या शिबिराने सेवाभाव, संघटीत कार्य आणि समर्पण असेल तर मोठे कार्य होऊ शकते याचा वस्तूपाठ घालून दिला.
रक्तदानाचा महायज्ञ सुरूच
दोन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथे परमुख स्वामी महाराज यांच्या शताब्दी वर्षात केवळ 30 दिवसांत 59 लाख सीसी रक्त संकलीत झाले होते. बीएपीएसच्या 55,000 हून अधिक स्वयंसेवकांनी दरवर्षी 1.5 कोटींहून अधिकची सेवा दिली आहे. यामध्ये महिला स्वयंसेवकांनी हिरारीने सहभगा नोंदवला आहे. बीएपीएस हे निरंतर सेवा कार्य केवळ हिंदू समाजासाठीच करत आहे असे नाही तर संपूर्ण मानवतेसाठी ते हे सेवाकार्य करत आहेत.
वैद्यकीय सेवेत बीएपीएस आघाडीवर
सामाजिक कार्यासोबत बीएपीएस वैद्यकीय सेवेतही आघाडीवर आहे. वैद्यकीय क्षेत्रात संघटना उत्कृष्ट कार्य करते. बीएपीएस चॅरिटीजद्वारे दरवर्षी लाखो रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येतात. ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागात सेवा देण्यासाठी मोबाईल क्लिनिक्स आणि डायग्नोस्टिक शिबिरांचं आयोजन करण्यात येते. गुजरातमधील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरातून दोन नवीन वैद्यकीय व्हॅनचे नुकतेच उद्धघाटन करण्यात आले. संस्थेच्या 14 मोबाईल वैद्यकीय क्लिनिक्स सक्रीय आहे. दुर्गम भागात प्राथमिक उपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कठीण काळात या व्हॅनची मोठी मदत होते. कोविड-19 महामारीत या संघटनेने तातडीची वैद्यकीय मदत पुरवत लाखो कुटुंबांना मदतीचा हात दिला.
बीएपीएसचे रुग्णालय
1. श्री परमुख स्वामी महाराज रुग्णालय — सुरत
2. योगिजी महाराज रुग्णालय — अहमदाबाद
3. शास्त्रिजी महाराज रुग्णालय — अतलदरा (वडोदरा)
4. परमुख स्वामी आरोग्य केंद्र — बोटाड
5. परमुख स्वामी महाराज रुग्णालय — डाभोई
6. परमुख स्वामी नेत्र रुग्णालय — मुंबई
