AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vegetable Price : कोथिंबिरीला सोन्यासारखा भाव; एका जुडीचा भाव ऐकून डोळे पांढरे होणार,किंमत तरी काय?

Expensive Vegetables : अतिवृष्टीने राज्यात दाणादाण उडवली. अनेक भागात मुसळधार पावसाचा पिकांना फटका बसला. शेतात पाणी साचले. परिणामी भाजीपाल्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एका कोथिंबीर जुडीचा भाव ऐकून अनेकांची भांबेरी उडाली.

Vegetable Price : कोथिंबिरीला सोन्यासारखा भाव; एका जुडीचा भाव ऐकून डोळे पांढरे होणार,किंमत तरी काय?
भाजीपाला महागला
| Updated on: Oct 07, 2025 | 3:58 PM
Share

अतिवृष्टीने राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेताला तळ्याचं स्वरुप आलं. खरीप पिकांचंच नाही तर भाजीपाल्याच मोठं नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने भाजीपाला सडला आहे. तर ज्या ठिकाणी उत्पादन झालं. त्या मालाची आवक होऊ शकली नाही. मागणी जास्ता आणि पुरवठा कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किंमती महागल्या. नाशिकमध्ये एका जुडीचा भाव ऐकून ग्राहकांना मोठा धक्का बसला. तर इतर भाजीपाल्याच्या किंमती पण गगनाला भिडल्या आहेत.

कोथिंबीर जुडी 200 रुपयांना

कोथिंबिरीने हंगामातील सर्वात मोठा उच्चांक गाठला. एका जुडीला 200 रुपये दर मिळाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर जुडीला 200 रुपयांचा विक्रमी दर मिळाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील कोथिंबीरीचे उभे पीक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. कोथिंबिरीची आवक घटल्याने बाजारात किंमती वधारल्या. दरात 30 टक्क्यांची वाढ झाली.

गेल्या गुरुवारी चायना कोथिंबीरला 170 रुपये प्रति जुडी, 17,050 रुपये शेकडा भाव मिळाला होता. यंदा पहिल्यांदाच कोथिंबीरीला 20 हजार रुपये शेकडा असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला. कोजागरी पौर्णिमेमुळे सोमवारी आवक आणखी घटली, त्यामुळे मागणी वाढली आणि दर गगनाला भिडले. नाशिक बाजार समितीत आज 53 हजार कोथिंबीर जुड्यांची आवक नोंदविण्यात आली.

शेपूला 50 रुपये किलो भाव

धुळे तालुक्यातील कापडणे वरखेडी आधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाल्याचे उत्पन्न घेत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात शेपू, पालक, मेथी, कोबीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यात शेपूला 50 रुपये किलोने भाव भेटला. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या अनेक दिवसानंतर शेपूला चांगला भाव भेटत असल्याने शेतकरी आनंदात आहे. सध्या शेपू काढणीला वेग आला आहे.

भाजीपाल्याला दुप्पट भाव

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने मराठवाडा विदर्भ आणि धाराशिव या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता भाजीपाला मध्ये दुप्पटीने वाढ झाली आहे. दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट बिघडले आहे. पहिले ग्राहक १ किलो भाजी खरेदी करायचा आता अर्धा किलोच भाजी खरेदी करत आहेत. पावसामुळे भाज्यांना पाणी लागून त्या खराब होत असल्याने यामध्ये वाढ झाली आहे असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे

कोणत्या भाजीपाल्यामध्ये वाढ  

वांगी 80 रुपये किलो

टमाटे 40 रुपये किलो

फ्लॉवर 80 रुपये किलो

काकडी 60 रुपये किलो

कोबी रुपये 60 किलो

शिमला मिरची 120 रुपये किलो

भेंडी 80 रुपये किलो

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.