माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेने रद्द केली (BMC action on Mahim Family care hospital) आहे.

सचिन पाटील

| Edited By:

Aug 02, 2020 | 10:51 AM

मुंबई : माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेने रद्द केली (BMC action on Mahim Family care hospital) आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून घेण्यात आलेले अधिक पैसे आणि एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यासोबत जी उत्तर पालिकेच्या कार्यालयात आतपर्यंत अनेक कोरोनामुक्त रुग्णांनी या रुग्णालयाची तक्रार केली होती (BMC action on Mahim Family care hospital).

या निर्णयानंतर रुग्णालयात दाखल रुग्णांची 48 तासात अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे. तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये असे आदेशही पालिकेने दिले आहेत.

माहीममधील क्रॉस रोड क्रमांक 2, एम. एम. चोटानी मार्गावरील ‘फॅमिली केअर’ हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे एक ते दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या रुग्णालयाने आपल्याकडून उपचारासाठी सरकारी दराऐवजी अधिक पैसे घेतल्याची तक्रार कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनी पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला होता. तरीही त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात येत होते. तसेच त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आली होती. रुग्णाचा मृत्यू आणि यापूर्वीच्या ‘कारणे दाखवा’ नोटीसला उत्तर न दिल्यामुळे ‘बॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1949’अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्यचे आदेश पालिकेने दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या काळात मुंबईसह राज्यात अनेक रुग्णालयाबाबत नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या काळात काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांनाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहे.

संंबंधित बातम्या :

Pune Corona : पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

Kolhapur Corona | कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील 10 व्हेंटिलेटर्स बंद, कोरोना रुग्णांचे हाल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें