Mumbai Water Cut | मुंबईमध्ये 26-27 ऑक्टोबरला पाणीकपात, दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय

मंगळवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सकाळी 10 ते बुधवार म्हणजेच 27 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणआर आहे. एस, के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

Mumbai Water Cut | मुंबईमध्ये 26-27 ऑक्टोबरला पाणीकपात, दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय
mumbai water cut

मुंबई : मंगळवारी म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सकाळी 10 ते बुधवार म्हणजेच 27 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणआर आहे. एस, के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

राखीव उदंचन संच बसविण्याचे काम करण्यात येणार

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप संकूल येथील 1910 दशलक्ष उदंचन केंद्रात दोन 1200 मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच पिसे-पांजरापूर संकुलातील तृतीय टप्प्याच्या उदंचन केंद्रातील एक नादुरुस्त उदंचन संच काढून त्या ठिकाणी राखीव उदंचन संच बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम 26ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. याच कारणामुळे या वेळेतमुंबई महानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरे आणि शहर विभागातील सर्व भागात पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या भागात 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

पवई येथील पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम

याशिवाय, पवई येथे 1800 मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व तानसा पश्चिम जलवाहिनीवरील गळती रोखण्याचे काम मंगळवार दिनांक 26 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून 27 ऑक्टोबर सकाळी 10 वाजपेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत म्हणजे, मंगळवार सकाळी 10 वाजेपासून ते बुधवार 27 ऑक्टोबर सकाळी 10 वाजपेपर्यंत के/पूर्व, एस, जी/उत्तर व एच/पूर्व या विभागांमधील खालील नमूद परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

कोणकोणत्या भागात पाणीकपात होणार

1) एस विभाग – फिल्टरपाडा एस एक्स – 6 – (24 तास) – जयभिम नगर, बेस्ट नगर, आरे मार्ग आणि परिसर, फिल्टरपाडा

2) के/पूर्व विभाग – मरोळ बस बार क्षेत्र, केई 1- (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक 1 व हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरत सिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, नवपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांती नगर

3) के/पूर्व विभाग – सहार रोड क्षेत्र, केई 1 – (दुपारी 2 ते सायंकाळी 5.30 वाजता) – कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍण्ड टी वसाहत

4) के/पूर्व विभाग – ओम नगर क्षेत्र, केई 2 – (पहाटे 4 ते सकाळी 8 वाजता) – ओम नगर, कांती नगर, राजस्थान सोसायटी, साईनगर (तांत्रिक क्षेत्र), सहार गाव, सुतार पाखडी (पाईपलाईन क्षेत्र)

5) के/पूर्व विभाग – एम. आय. डी. सी. व भवानी नगर केई 10 – (सकाळी 11ते दुपारी 2 वाजता) – मुलगाव डोंगरी, सुभाष नगर, एम. आय. डी. सी. मार्ग क्रमांक 1 ते 23, भंगारवाडी, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गा पाडा, मामा गॅरेज

6) के/पूर्व विभाग – विजय नगर मरोळ क्षेत्र, केई – 10ए – (सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता) – विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओआसिस, गांवदेवी, मरोळ गांव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा

7) के/पूर्व विभाग – सिप्झ तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ (24 तास)

8) एच/पूर्व विभाग – बांद्रा टर्मिनल पुरवठा क्षेत्र

9) जी / उत्तर विभाग – धारावी सायंकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत) – धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, ए. के. जी. नगर, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, संत गोराकुंभार मार्ग

10) जी / उत्तर विभाग – धारावी सकाळचे पाणीपुरवठा क्षेत्र – (पहाटे 4 ते दुपारी 12वाजेपर्यंत) – प्रेम नगर, नाईक नगर, जास्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, 90 फीट रोड, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, संत रोहिदास मार्ग

दरम्यान या काळात  पाणीकपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक तितका साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.

इतर बातम्या :

Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

(bmc announces water cut on 26 and 37 october due to repairing work)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI