AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार

Mumbai Water cut | यानंतर अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दोन्ही ठिकाणी 6 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पाणीपुरवठा खंडित होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

Mumbai Water Supply: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार
पाणीकपात
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 04, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई: आगामी काही दिवसांमध्ये मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशी माहिती दिली आहे. परळ आणि नायगावात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा बंद असेल. या दोन्ही ठिकाणी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते 6 ऑक्टोबरच्या सकाळी दहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

यानंतर अंधेरी आणि विलेपार्ले परिसरात 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दोन्ही ठिकाणी 6 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पाणीपुरवठा खंडित होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

पाणीपुरवठा का बंद राहणार?

जलवाहिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या काळात देखभाल दुरुस्तीचे काम केले जाईल. बीएमसीने या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी आवश्यक पाणी ठेवावे असे आवाहन केले आहे.

देखभालीच्या कामामुळे काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत त्याचबरोबर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येईल. लोकांना उत्तम दर्जाचे स्वच्छ पाणी देण्यासाठी हे देखभालीचे काम वेळोवेळी केले जाते, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात समाधानकारक पाणीसाठा

पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव (mumbai water supply lake ) यंदा तुडूंब भरले आहेत. त्यामुळे यंदा मुंबईकरांना पाणी कपातीचा त्रास उद्भवणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तलाव परिसरात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे वैतरणा, तानसासह इतर सर्व तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठा (mumbai water supply lake) जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या तलावांमधून दरदिवशी 3800 दशलक्ष अर्थात 380 कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो.

संबंधित बातम्या:

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मिळतोय युनिव्हर्सल पास, जाणून घ्या फायदे

Mumbai School Reopen : मुंबईत शाळा सुरु, एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची संमती आवश्यक, वाचा काय काय नियम

प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा; Electric Car रॅलीत आदित्य ठाकरेंचं आवाहन

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश