Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस

अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.  या सर्व गोष्टी घडत असताना सोशल मीडियावरदेखील वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मीम्स, मजेदार पोस्टचा तर पाऊस पडतोय. अनन्या पांडेला काही नेटकरी सपोर्ट करत आहेत; तर काही नेटकरी प्रचंड ट्रोल करताना दिसतायत.

Video | अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी, सोशल मीडियावर भन्नाट मीम्सचा पाऊस
ANANYA PANDEY


मुंबई : क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचेही नाव समोर आले आहे. अनन्या पांडेची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली.  या सर्व गोष्टी घडत असताना सोशल मीडियावरदेखील वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मीम्स, मजेदार पोस्टचा तर पाऊस पडतोय. अनन्या पांडेला काही नेटकरी सपोर्ट करत आहेत; तर काही नेटकरी प्रचंड ट्रोल करताना दिसतायत.

अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीचे अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन झाडाझडती केली आहे. तसेच अनन्या पांडेचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय. अनन्या ही शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या संपर्कात होती असे म्हटले जात आहे. याच कारणामुळे तीची एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली.

आर्यन खानची शैक्षणिक आणि मेडिकल हिस्ट्री मागवली 

दरम्यान, एनसीबीने शाहरुख खानचे घर म्हणजेच मन्नतवर जाऊन झडती घेतलीय. तसेच एनसीबीने आर्यन खानची शैक्षणिक आणि मेडिकल हिस्ट्री मागवल्याचीही माहिती मिळत आहे.

इतर बातम्या :

NCB raids in Mumbai LIVE Updates : अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल

शिर्डीत जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याचा किळसवाणा प्रकार, महिला साईभक्ताला अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले

‘रामायणा’तील आणखी एका पात्राने घेतला जगाचा निरोप, ‘निषाद’ साकारणाऱ्या चंद्रकांत पंड्यांचे निधन

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI