मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवाद

मुंबई महापालिकेच्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्यासह देशभरातील विविध यंत्रणांनी आणि जगातील विविध संस्थांनी घेतली. मुंबई पॅटर्नची सर्वत्र चर्चा झाली (BMC commissioner Iqbal Singh Chahal on Mumbai Pattern)

मुंबई शहराने कोरोनाला कसं रोखलं? इक्बाल सिंह चहल यांचा राज्यातील महापालिका आयुक्तांशी संवाद
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 11:04 PM

मुंबई : मुंबई महापालिकेने कोरोना काळात केलेलं काम उल्लेखणीय आहे. महापालिकेच्या कामाची दखल सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांच्यासह देशभरातील विविध यंत्रणांनी आणि जगातील विविध संस्थांनी घेतली. मुंबई पॅटर्नची सर्वत्र चर्चा झाली. मुंबई महानगरपालिकेच्या या सर्वस्तरीय व सर्वंकष प्रयत्नांची माहिती राज्यातील इतर महापालिकांना देखील व्हावी, या हेतुने राज्यातील विविध महापालिकांच्या आयुक्तांशी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज संवाद साधला (BMC commissioner Iqbal Singh Chahal on Mumbai Pattern).

या संवादादरम्यान आयुक्तांनी मुंबईत राबविलेल्या विविध उपाययोजनांची, नियोजनाची आणि अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. तसेच या अनुषंगाने विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे उदाहरणांसहीत देऊन मार्गदर्शन देखील केले. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली (BMC commissioner Iqbal Singh Chahal on Mumbai Pattern).

महापालिका आयुक्तांनी साधलेल्या संवादातील ठळक मुद्दे :

1) मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड बाधित पहिला रुग्ण मार्च 2020 मध्ये आढळून आला. तेव्हापासून आजतागायत महानगरपालिका सातत्याने आणि अविरतपणे कोविड 19 प्रतिबंध व उपचार विषयक सर्वस्तरीय कार्यवाही करीत आहे. यासाठी महानगरपालिकेचे कामगार, कर्मचारी, अधिकारी अथकपणे कार्यरत आहेत. यामध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

2) बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्वच 24 प्रशासकीय विभागात सदोदित सूक्ष्मस्तरीय नियोजन अव्याहतपणे करण्यात येत आहे. यामध्ये घर, सोसायटी, रस्ता, गल्ली अशा सर्वच बाबींचा विचार करुन नियोजन करण्यात येत आहे.

3) सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दररोज सरासरी सुमारे 45 हजार व्यक्तींची कोविड चाचणी केली जाते. तसेच ज्या व्यक्तिंच्या चाचणी अहवाल कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे, अशा व्यक्तिंच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंचे ‘Contact Tracing’ देखील केले जाते. यामुळे कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होते.

4) धारावीसह बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विविध स्तरीय उपायोजना अव्याहतपणे राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘चेस द वायरस’ आणि ‘ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रॅकींग, ट्रिटिंग’ या चतु:सूत्री आधारित उपाययोजनांचा समावेश आहे. याअंतर्गत बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंचा अत्यंत प्रभावीपणे शोध घेत संबंधित व्यक्तिंचे अलगीकरण (विलगीकरण) करणे, आवश्यकतेनुरुप संशयितांच्या व बाधितांच्या कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करणे आणि लक्षणे असलेल्या बाधितांवर ‘सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार’ अर्थात ‘मेडिकल प्रोटोकॉल’नुसार औषधोपचार करण्याचा समावेश आहे.

5) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड बाधित रुग्णांना योग्य ते औषधोपचार मिळावेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत रुग्णांना आवश्यक ती औषधे, इंजेक्शन इत्यादी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने प्रचलित पद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून औषधोपचार विषयक साठा आवश्यकतेनुसार व नियमितपणे उपलब्ध करुन घेण्यात येत आहे.

6) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या रुग्णांना रुग्णालयात किंवा कोरोना काळजी केंद्रात (Corona Covid Centre) दाखल होण्याची आवश्यकता आहे, अशा नागरिकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने अत्यंत अल्पावधीत विविध ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या. तसेच अनेक ठिकाणी पूर्णपणे नव्याने जंबो कोविड सेंटरची उभारणी देखील केली.

7) रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अनेक कोविड रुग्णांना प्राणवायुची नितांत गरज असते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड आहेत, अशा सर्व रुग्णालयांना वेळच्या-वेळी प्राणवायू पुरवठा उपलब्ध व्हावा, या दृष्टीने महानगरपालिकेच्या स्तरावर सर्व 24 विभागांसाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर या दृष्टीने सूक्ष्मस्तरीय नियोजन, समन्वयन, व्यवस्थापन साध्य करता यावे आणि केंद्र शासन, राज्य शासन व ऑक्सिजन पुरवठादार कंपन्या यांच्याशी वेळोवेळी सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने देखील सातत्यपूर्ण कार्यवाही अविरतपणे करण्यात येत आहे.

8) बृहन्मुंबई मनपा रुग्णालयांमध्ये प्राणवायुची उपलब्धतता अधिक सुलभतेने व्हावी, या दृष्टीने महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या क्षमतेचे पी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सीजन प्लांट कार्यरत आहेत. तर या व्यतिरिक्त आणखी 12 ठिकाणी पी.एस.ए. तंत्रावर आधारित ऑक्सीजन प्लांट करणारे प्रकल्प उभारण्याची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आहे.

9) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांसह त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंची चाचणी वेळच्यावेळी होऊन त्यापैकी ‘पॉझिटिव्ह’ चाचणी अहवाल हे महापालिकेकडे निर्धारित वेळेत उपलब्ध व्हावेत, तर यापैकी ज्यांना गरज असेल त्यांना महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक किंवा खासगी रुग्णालयात किंवा जंबो फॅसिलिटी असलेल्या उपचार केंद्रात वेळच्यावेळी ‘बेड’ उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेच्या सर्व म्हणजे 24 प्रशासकीय विभागांमध्ये विभागस्तरीय ‘वॉर रुम’ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या विकेंद्रीत व्यवस्थापनामुळे गरजूंना त्यांच्या परिसरानिकटच्या रुग्णालयात ‘बेड’ मिळण्याची शक्यता दुणावण्यासह तुलनेने अधिक लवकर उपचार सुरु होण्यास गती मिळाली.

10) वरीलनुसार महापालिकेच्या 24 विभागांमध्ये अव्याहतपणे कार्यरत असणा-या प्रत्येक वॉर्ड वॉर रुम मध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सहाय्यक इत्यादी दिवसाचे 24 तास कार्यरत असतात. त्याचबरोबर प्रत्येक वॉर्ड वॉर रुमसाठी साधारणपणे प्रत्येकी १० एवढ्या संख्येने रुग्णवाहिका कार्यरत आहेत.

11) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात ‘कोविड 19’ ची रुग्ण संख्या शुन्यावर आणण्यासाठी शीघ्रकृती कार्यक्रमाची अभियान स्वरुपात अंमलबजावणी करण्याचा कार्यक्रम बृहन्मुंबई महापालिकेने हाती घेतला. या प्रयत्नांना मा. लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थाचेही मोलाचे सहकार्य लाभले.

12) या अंतर्गत प्रामुख्याने 50 फिरते दवाखाने विविध परिसरांमध्ये जाऊन प्राथमिक तपासणीकरुन बाधितांचा शोध घेतात. यानुसार गरज असणाऱ्या भागांमध्ये 2 ते 3 आठवडे मिशन मोडमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येतो.

13) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांच्या स्तरावर जाणीवजागृती करणे, नागरिकांना घराबाहेर पडण्याची गरज भासू नये, यासाठी जीवनावश्यक बाबींची उपलब्धता करून देण्याची कार्यवाही करणे आदी बाबींची अंमलबजावणी सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी मुंबई पोलीस दलाची साथ महापालिकेला अव्याहतपणे मिळत आहे.

14) झोपडपट्टी परिसरांसह इतर परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा होत असलेला वापर आणि त्यामुळे संसर्गाची संभाव्यता लक्षात घेत महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने निर्जंतुकीकरण दिवसातून अनेकदा केले जात आहे. तसेच सार्वजनिक शौचालयांमध्ये साबण, सॅनिटायझर असण्याकडेही काळजीपूर्वक लक्ष पुरविण्यात येत आहे.

15) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी, या दृष्टीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये घरोघरी जाऊन भेटी देणे व नागरिकांना यथायोग्य माहिती देणे, यासारख्या बाबींसोबतच विविध संवाद माध्यमांचा वापर करुन जनजागृती सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी वृत्तपत्रे, नभोवाणी, दूरचित्रवाणी, अत्याधुनिक समाजमाध्यमे, होर्डिंग, पोस्टर, बॅनर, घडीपत्रिका इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येत आहे.

16) बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील बेघर, भिक्षेकरी, देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती, तृतीय पंथीय यांना लॉकडाऊन काळात अन्नधान्य मिळविण्यात अडचणी येऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन अशा सर्व व्यक्तिंना अन्नधान्य किट किंवा जेवण पुरविण्याचे कार्य देखील महापालिकेद्वारे करण्यात आले.

17) महाराष्ट्र शासनाच्या निर्देशांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सप्टेंबर – ऑक्टोबर 2020 मध्ये अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. या अंतर्गत घरोघर जाऊन नागरिकांची प्राणवायू पातळी मोजणे, तापमान मोजणे आदी बाबी करण्यात आल्या. त्याचबरोबर घरातल्या व्यक्तिंना सह-व्याधी असल्यास किंवा कोविड विषयक लक्षणे असल्यास त्याबाबतदेखील निर्धारित उपचार क्रमानुसार कार्यवाही करण्यात आली. या मोहिमेचा मोठा प्रभाव महानगरपालिका क्षेत्रात दिसून आला. या मोहिमेनंतर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील कोविड बाधितांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाल्याचे आढळून आले होते.

18) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या कोविड बाधित रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांवर योग्यप्रकारे अंत्यसंस्कार व्हावेत, यादृष्टीने महापालिकेने स्मशानभूमी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली गेल्यावर्षी पासूनच कार्यान्वित केली आहे. त्याचबरोबर दफनभूमीतील अंत्यसंस्काराबाबत देखील महापालिका सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन संवेदनशीलपणे करीत आहे.

19) कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने अप्रत्यक्षपणे जनजागृती साधण्याचा व चांगल्या सवयी बिंबविण्यासाठी तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची परिणामकारकता वाढविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नरत आहे. या अनुषंगाने मास्क वापरण्याबाबत जनजागृती व दंडात्मक कारवाई या दोन्ही बाबींचे महत्त्व महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या स्वतःच्या उदाहरणातून सांगत आपण स्वतः सातत्याने व नियमितपणे मास्क वापरतोच, पण त्याचबरोबर कार्यालयातील सर्व कर्मचा-यांना देखील आग्रहाने मास्क वापरण्यास सांगतो, असे नमूद केले.

20) महापालिकेच्या स्तरावर कार्यरत असणा-या प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र कार्यदायित्व सोपविणे गरजेचे असून चांगल्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एकच काम अनेक व्यक्तींना देणे कटाक्षाने टाळायला हवे, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले.

21) प्रशासकीय स्तरावर काम करत असताना महापालिकेने मा. लोकप्रतिनिधींसह सर्वंच मान्यवर लोकप्रतिनिधींशी आदराने संवाद साधणे व आपुलकी निर्माण करणे आवश्यक असल्याचे महापालिका आयुक्तांनी नमूद केले.

22) कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाशी लढा देत असताना आपल्या सहका-यांशी व विशेषतः डॉक्टरांशी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी आपुलकीने संवाद साधणे, अत्यंत गरजेचे व उपयोगी असल्याचे महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान आवर्जून नमूद केले.

हेही वाचा : 10 वी परीक्षा घेणं शक्य नाही, राज्य सरकार उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.