BMC Election Results 2026 LIVE : भाजपच्या गडाला ठाकरे गटाचा सुरुंग? दिग्गजांची धाकधूक वाढली

Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या एन (N) वॉर्डचा (घाटकोपर-विक्रोळी) लाईव्ह निकाल येथे पाहा. प्रभाग १२२ ते १३३ मधील विजयी उमेदवार आणि पक्षांची संपूर्ण यादी उपलब्ध.

BMC Election Results 2026 LIVE : भाजपच्या गडाला ठाकरे गटाचा सुरुंग? दिग्गजांची धाकधूक वाढली
BMC
| Updated on: Jan 16, 2026 | 4:43 PM

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष ईशान्य मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एन (N) वॉर्डकडे लागले आहे. या वॉर्डमध्ये प्रामुख्याने घाटकोपर (पूर्व-पश्चिम) आणि विक्रोळीचा काही भाग येतो. यात प्रभाग क्रमांक 123 ते 133 अशा एकूण 12 प्रभागांचा समावेश आहे. हा परिसर भौगोलिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत वैविध्यपूर्ण असून येथे टोलेजंग इमारती, आयटी हबसोबतच आशियातील मोठ्या वस्त्यांचे जाळे पसरलेले आहे. 2017 च्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली होती. मात्र यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता ही राजकीय समीकरणे कोणाला पावणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार पक्ष
123 सुनील मोरे (आघाडीवर) शिवसेना ठाकरे गट
124 सकिना शेख (आघाडीवर) शिवसेना ठाकरे गट
125
126
127 स्वरुपा पाटील (आघाडीवर) शिवसेना ठाकरे गट
128
129
130
131
132
133

 

प्रभाग 123 : हनुमाननगर आणि विक्रोळी पार्क साईट परिसर असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये अपक्ष उमेदवार स्नेहल मोरे विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेनेच्या भारती बावदाने यांना हरवले होते. 53,533 लोकसंख्या असलेला हा प्रभाग आता सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रभाग 124 : या प्रभागात वर्षानगर आणि आर. सिटी मॉलचा परिसर येतो. 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या ज्योती हारुन खान यांनी शिवसेनेच्या शामली तळेकर यांचा पराभव केला होता. 57,249 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रभाग 125 : रमाबाई कॉलनी आणि गोदरेज कंपनी परिसर असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये शिवसेनेच्या रुपाली आवळे यांनी भाजपच्या साक्षी पवार यांचा पराभव केला होता. 57,915 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा सर्वसाधारण गटासाठी आहे.

प्रभाग 126 : जगडुशानगर आणि इंदिरानगरच्या या प्रभागात 2017 मध्ये मनसेच्या अर्चना भालेराव यांनी शिवसेनेच्या स्वाती शितप यांना पराभूत केले होते. 56,949 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव आहे.

प्रभाग 127 : रामनगर आणि भीमनगर परिसर असलेल्या या प्रभागातून 2017 मध्ये शिवसेनेचे सुरेश पाटील विजयी झाले होते. 56,671 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रभाग 128 : बर्वे नगर आणि काजूपाडा या भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये शिवसेनेच्या अश्विनी हांडे विजयी झाल्या होत्या. 49,716 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) गटासाठी राखीव आहे.

प्रभाग 129 : चिरागनगर आणि माणिकलाल इस्टेटचा समावेश असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये भाजपचे सूर्यकांत गवळी यांनी शिवसेनेच्या प्रदीप मांडवकर यांचा पराभव केला होता. 55,640 लोकसंख्या असलेला हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

प्रभाग 130 : करोल व्हिलेज आणि टी.पी.एस. कॉलनी परिसर असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये भाजपच्या बिंदू त्रिवेदी यांनी शिवसेनेच्या कविता वाळुंज यांना हरवले होते. 53,947 लोकसंख्या असलेला हा प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) साठी राखीव आहे.

प्रभाग 131 : नायडू कॉलनी आणि सावित्रीबाई फुलेनगरच्या या प्रभागात 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांनी भाजपच्या मंगल भानुशाली यांचा पराभव केला होता. 61,882 लोकसंख्या असलेला हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव आहे.

प्रभाग 132 : सोमय्या कॉलेज आणि गरोडिया नगरचा समावेश असलेला हा या वॉर्डमधील सर्वात मोठा प्रभाग आहे. 2017 मध्ये भाजपच्या पराग शाह यांनी शिवसेनेच्या सुधाकर पाटील यांना पराभूत केले होते. 62,992 लोकसंख्या असलेला हा प्रभाग सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव आहे.

प्रभाग 133 : कामराजनगर आणि रमाबाई आंबेडकर नगर असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये मनसेचे परमेश्वर कदम यांनी शिवसेनेच्या सचिन गायकवाड यांचा पराभव केला होता. 59,950 लोकसंख्या असलेला हा प्रभाग यंदा अनुसूचित जाती (महिला) गटासाठी राखीव आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

मुंबई महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE