AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Booster Dose Guidelines : बुस्टर डोस कुणाला मिळणार? नोंदणी कशी असणार, मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी

आता मुंबई महापालिकेनं केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या तिसऱ्या डोससंदर्भात नियमावली जाहीर केली आहे.

BMC Booster Dose Guidelines : बुस्टर डोस कुणाला मिळणार? नोंदणी कशी असणार, मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी
मुंबईतल्या कोरोना नियमात शिथिलता
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 6:46 AM
Share

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं राज्यात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात झालीय. महाराष्ट्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला  (Corona Vaccine)चांगला प्रतिसाद मिळतोय. मुंबई महापालिकेनं (BMC) देखील मुलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली आहे. आता मुंबई महापालिकेनं केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणं फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या तिसऱ्या डोससंदर्भात नियमावली जाहीर (BMC Booster Dose Guidelines ) केली आहे. मुंबई महापालिकेनं बुस्टर डोससंदर्भात नियमावली जारी केली असून पात्र व्यक्तींना कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर

मुंबई महानगरपालिकेकडून बूस्टर डोस देण्यासंदर्भातली नियमावली जाहीर करण्यात आली आहे. येत्या 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, कोव्हिडमध्ये आघाडीवर काम करणारे फ्रंटलाईन कर्मचारी आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीचे डोस देण्यात येणार आहेत. वरील सर्व जणांनी दुसरा डोस घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास तिसऱ्या डोससाठी पात्र असतील.

ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीनं सुविधा उपलब्ध होणार

फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीनं कोविन पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असं मुंबई महापालिकेच्यावतीनं कळवण्यात आलं आहे. सर्व नागरिकांना शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होणार आहे.

मुंबईत 20181 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत गुरुवारी ( 6 जानेवारी) विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. मुंबई तब्बल 20 हजारपेक्षा नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 20181 नव्या रुग्णांचं निदान मुंबईत झालं तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबईत आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 17154 रुग्णांमध्ये कोणतिही लक्षणं आढळून आलेली नाहीत. मुंबईत दिवसभरात 2 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचं दिसून आलं आहे.

इतर बातम्या:

इतर बातम्या:

दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अ‍ॅक्शन प्लान तयार

शाळा, कॉलेज बंद करून मुले मॉल्समध्ये फिरणार असतील तर काय? लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे?

Corona Updates: लॉकडाऊन, मुंबई लोकल ते राजकीय सभा, पवारांनी टोपेंना कोणत्या सूचना दिल्या?

BMC issue guidelines for Corona Booster dose vaccination for frontline workers and senior citizens

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....