BMC Election Reservation 2022 : महाडेश्वर, पाटणकर, आजमी, पुरोहित, सरवणकरांना फटका, मतदारसंघ आरक्षित, अब जाये तो जाये कहाँ!

BMC Election Reservation 2022 : माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी आणि भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित तसेच ज्योती अळवणी यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत.

BMC Election Reservation 2022 : महाडेश्वर, पाटणकर, आजमी, पुरोहित, सरवणकरांना फटका, मतदारसंघ आरक्षित, अब जाये तो जाये कहाँ!
मुंबई महापालिका Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 2:56 PM

मुंबई: मुंबई महापालिकेच्या  (bmc) निवडणुकीची आरक्षण (reservation) सोडत जाहीर झाली आहे. आरक्षण सोडतीत आपला मतदारसंघ सुरक्षित राहावा म्हणून देव पाण्यात अनेक नगरसेवक बसले होते. त्यापैकी काही नगरसेवकांचे मतदारसंघ सुरक्षित राहिले आहेत. मात्र, काहींचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांची प्रचंड गोची झाली आहे. शिसवसेनेचे (shivsena) नेते, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर, अनिल पाटणकर, काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आजमी आणि भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित तसेच ज्योती अळवणी यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांची चेहरे पडले असून आता जाये तो जाये कहाँ अशी या नगरसेवकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे या नगरसेवकांना आता नवीन वॉर्ड शोधावे लागणार आहेत. मात्र, आधीच त्या मतदारसंघात असलेले नगरसेवक इतरांना जागा सोडतील काय? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अनुसूचित जातीसाठीचे राखीव मतदारसंघ

60,85,107,119,139,153,157,162,165,190,194,204,208, 215, 221

हे सुद्धा वाचा

15 प्रभागातून 8 प्रभाग स्त्रियांसाठी राखीव

139 अनुसुचित जाती महिला sc 190 अनुसुचित जाती महिला sc 194 अनुसुचित जाती महिला sc 165 अनुसुचित जाती महिला sc 107 अनुसुचित जाती महिला sc 85 अनुसुचित जाती महिला sc 119 अनुसुचित जाती महिला sc 204 अनुसुचित जाती महिला sc

अनुसूचित जमातीसाठीचे राखीव मतदारसंघ

55, 124

अनसूचित जमाती महिला राखीव

124

सर्वसाधारण महिला आरक्षण

  1. प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 22, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 172, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230,236
  2. प्राधान्य क्रम 2 (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233, 234
  3. सर्वसाधारण महीला आरक्षित प्रभाग क्रमांक – 44, 102, 79,11,50,154,155,75,160,81,88,99,137,217,146, 188, 148,96 ,9, 185,130, 232,53

यांचे मतदारसंघ राखीव

60 – योगीराज दाभाडकर भाजप 85 ज्योती अळवणी भाजप अजा महिला 107  समिता विनोद कांबळे (भाजप 119-मनिषा रहाटे राष्ट्रवादी 139- अख्तर अब्दुल रज्जाक कुरेशी सपा (अजा महिला) 153 अनिल पाटणकर शिवसेना 157 आकांक्षा शेट्ये शिवसेना 162 वाजीद कुरेशी काँग्रेस 165आश्रफ आजमी काँग्रेस (अजा महिला) 190 शीतल गंभीर देसाई भाजप (अजा महिला 194- समाधान सरवणकर शिवसेना (अजा महिला) 204 अनिल कोकीळ शिवसेना अजा महिला 208 रमाकांत रहाटे शिवसेना 215 अरुंधती दुधवडकर शिवसेना 221 आकाश पुरोहित भाजप

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.