AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VandeBharat trains : मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे संरक्षण हा ‘बॉडीगार्ड’ करणार, रेल्वेमंत्र्यांनी जारी केला व्हिडिओ

वंदेभारत ट्रेनला वारंवार गुरांनी धडक दिल्याच्या घटना घडल्यामुळे रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूला कुंपण घालण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. रेल्वेमंत्र्यांनी याबाबतचा व्हीडीओ समाजमाध्यमावर शेअर केला आहे.

VandeBharat trains :  मुंबई-अहमदाबाद मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे संरक्षण हा 'बॉडीगार्ड' करणार, रेल्वेमंत्र्यांनी जारी केला व्हिडिओ
vandebharatImage Credit source: socialmedia
| Updated on: Jan 31, 2023 | 5:37 PM
Share

मुंबई : मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसला ( VANDEBHARAT ) आता ‘बॉडीगार्ड’ मिळाला आहे. हा ‘बॉडीगार्ड’ या ट्रेनसाठी संरक्षक कवच म्हणून काम करणार आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावर सेमी बुलेट ( SEMIBULLET )  ट्रेन वंदे भारत सुरू झाल्यापासून ती प्रवाशांच्या सोयीसाठी परंतू गुरांच्या धडकेमुळेच जास्त चर्चेत आली होती. या आलीशान गाडीला वारंवार गुरांनी धडक दिल्याने तिचे एअरोडायनामिक नाक वारंवार चेपले आहे. त्यामुळे या मार्गावर पोलादी फेन्सिंग ( fencing )  ( कुंपण ) घालण्याचे काम सुरू आहे.

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावर या मेटल फेन्सिंग ( धातूचे कुंपण ) घालण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कामाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच मेटल फेन्सिंग घालण्याचे काम लवकरच पूर्ण होईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर रेल्वे मार्गावरील कुंपणाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी हायस्पीड ट्रेन सुरू झाल्यानंतर या मार्गावर भरधाव गाडीने गुरांना ठोकरल्याचे अनेक तीन ते चार अपघात झाले आहेत. या गाडीच्या उद्धाटनाच्या आदल्या दिवशीच ती मुंबई सेंट्रलला येत असताना गांधीनगर गुरांशी तिची जोरदार धडक झाली होती.

मोकाट गुरे अनेकवेळा धडकली

गांधीनगर-मुंबई दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस तिच्या सेवेपेक्षा गुरांना धडकण्यासाठी ओळखली जात होती. दर ताशी 160 किमी वेगाने धावणाऱ्या वंदेभारत ट्रेनला मोकाट गुरांनी धडकेच्या तीन त घटना घडल्या आहेत, त्यामुळे रेल्वेनेही सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गायी – म्हशींच्या धडकेने वंदेभारत्या इंजिनच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. या अपघातामुळे रेल्वेसेवाही बाधित झाली होती.

धातूचे कुंपण बसवण्यासाठी निविदा काढल्या

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 620 किमी पेक्षा जास्त मार्गाला तटबंदी घालण्याचे काम पूर्ण झाले आहे, याकामासाठीच्या आठ निविदा मंजूर झाल्या आहेत. या कामासाठी सुमारे 245.26 कोटी रुपये खर्च येणार आहेत. आठही निविदाचे वाटप पूर्ण असून कामे वेगाने सुरू आहे. गुराख्यांनी आपली जनावरे रेल्वे रुळाजवळ सोडू नयेत, असे आवाहनही पश्चिम रेल्वेने केले आहे.

रेल्वेच्या ‘नाका’चे नुकसान

वंदे भारत एक्स्प्रेस इंजिन लेस ट्रेन आहे. या गाडीचे इंजिन डिझाइन पारंपरिक रेल्वे इंजिनापेक्षा वेगळे आहे. ही गाडीला लोकल ट्रेन किंवा मेट्रोप्रमाणे मोटर केबिन आहे. या गाडीला इंजिनच्या पुढच्या बाजूला एअरोडायनामिक गार्ड (नाक) बसवलेले असते. गुरांना धडक बसल्यानंतर हा फायबरचा कोन ( नाक ) वारंवार तुटला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये पाच ते सहा महिन्यांत रुळांच्या दोन्ही बाजूला तटबंदी उभारली जाईल असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले होते. गुरांच्या धडकेमुळे 2022-23 या वर्षात एकूण 2,521 मेल आणि एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.