AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योगपती नेस वाडियांना जपानमध्ये 2 वर्षांची जेल

टोकियो (जपान) : वाडिया ग्रुपचे मालक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंमली पदार्थ (ड्रग्) बाळगल्याचा आरोप नेस वाडिया यांच्यावर आहे. ‘द फायनाशियल टाईम्स’ या वृत्तपत्राने नेस वाडियांबाबतच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेस वाडिया यांना 20 मार्च 2019 च्या आधीच जपानमधील होक्काइडो आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर […]

उद्योगपती नेस वाडियांना जपानमध्ये 2 वर्षांची जेल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

टोकियो (जपान) : वाडिया ग्रुपचे मालक नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अंमली पदार्थ (ड्रग्) बाळगल्याचा आरोप नेस वाडिया यांच्यावर आहे. ‘द फायनाशियल टाईम्स’ या वृत्तपत्राने नेस वाडियांबाबतच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

नेस वाडिया यांना 20 मार्च 2019 च्या आधीच जपानमधील होक्काइडो आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर बाहेर येऊन, ते भारतात परतले होते. वैयक्तिक वापरासाठी ड्रग्ज बाळगल्याची नेस वाडिया यांनी कबुली दिली होती. नेस वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम ड्रग्ज सापडलं.

2020 साली जपानमधील टोकियोत ऑलिम्पिक, तर यंदा म्हणजे 2019 साली रग्बी वर्ल्ड कप आयोजित करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये अंमली पदार्थांबाबतचे धोरण अत्यंत कठोर करण्यात आले असून, कायद्याची काटेकोरपणे अंमलबाजवणी केली जात आहे.

कोण आहेत नेस वाडिया?

नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे ते सुपुत्र आहेत. नेस वाडिया हे वाडिया ग्रुपचे एकमेव वारसदार आहेत. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे ते सह-मालक सुद्धा आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर या कंपन्याही वाडिया ग्रुपच्या मालकीच्या आहेत. जवळपास 91 हजार 700 कोटी रुपयांच्या वाडिया ग्रुपच्या कंपन्या आहेत.

नेस वाडिया हे याआधीही वादात अडकले होते. 2014 साली बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नेस वाडिया यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर काही काळाने प्रीती झिंटानेच तक्रार मागे घेतली होती.

पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?
अजित पवारांकडून स्वबळाचा नारा! दादांची NCP 'या' महापालिकांत स्वतंत्र?.
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य
ते एकटे निष्ठावंत आहे का?जगतापांच्या राजीनाम्यावर रूपाली पाटलांच भाष्य.
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?
मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण....खडसे काय बोलून गेले?.
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?
पवारांच्या राष्ट्रवादीची सत्तेकडे वाटचाल? दादांबरोबर युती पहिली पायरी?.