पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

ठाणे : सैन्यदलात कॅप्टन पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत मोरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पत्नीचा छळ केल्याचा आणि नोकरी व लग्नाच्या आमिषाने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप कॅप्टन प्रशांत मोरे यांच्यावर आहे. प्रशांत मोरे यांचं 2015 साली डोंबिवलीच्या स्नेहा शिंदे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र त्यानंतर सतत काही […]

पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या

Follow us on

ठाणे : सैन्यदलात कॅप्टन पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत मोरे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पत्नीचा छळ केल्याचा आणि नोकरी व लग्नाच्या आमिषाने अनेक महिलांची फसवणूक केल्याचा आरोप कॅप्टन प्रशांत मोरे यांच्यावर आहे.

प्रशांत मोरे यांचं 2015 साली डोंबिवलीच्या स्नेहा शिंदे यांच्याशी लग्न झालं होतं. मात्र त्यानंतर सतत काही ना काही कारणावरुन ते आपला छळ करत होते, तसेच आपले अश्लील फोटो काढून ते सोशल साईट्सवर टाकण्याची धमकी देत होते, असा त्यांच्या पत्नीचा आरोप आहे. याबाबत पत्नीच्या तक्रारीनुसार डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल केला.

यानंतर प्रशांत मोरे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानं अखेर पोलिसांनी त्यांना पुण्याच्या सैन्यतळावरुन अटक केली. त्यांना आज कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. प्रशांत याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

प्रशांत मोरे यांची आजवर जिथे जिथे पोस्टिंग झाली, तिथे तिथे त्यांनी अनेक महिलांना नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय. याबाबत रामनगर पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.

दरम्यान, या सगळ्याबाबत स्नेहा मोरे यांना विचारलं असता, आपल्याला आपल्या पतीची दुष्कृत्य समोर आणायची असल्यानं हे पाऊल उचलल्याचं त्या म्हणाल्या, सोबतच सैन्याचं नाव आपल्याला खराब करायचं नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. कॅमरासमोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI