‘अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा?’, नांदगावकरांविरोधात गुन्हा दाखल

माटुंगा रेल्वे स्टेशनवर तरुणीची छेड काढणाऱ्या नराधमास चोप देणारे शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case filled against Nitin Nandgaonkar).

'अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा?', नांदगावकरांविरोधात गुन्हा दाखल


मुंबई : माटुंगा रेल्वे स्टेशनवर तरुणीची छेड काढणाऱ्या नराधमास चोप देणारे शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याविरोधात अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case filled against Nitin Nandgaonkar). नितीन नांदगावकर यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगावकर यांची चौकशी करुन त्यांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकादेखील करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणावर नितीन नांदगावकर यांनी आज आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर प्रतिक्रिया दिली आहे. “अटक, जामीन, सुटका, तक्रार करणारा अदृष्य आत्मा? असा सवाल नांदगावकर यांनी केला. मात्र, “तरीही विकृताला ठोकतच राहणार”, असा इशारा नांदगावकर यांनी फेसबुकवर दिला.

नितीन नांदगावकर यांनी 17 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओत त्यांनी माटुंगा रेल्वे स्टेशनवर तरुणीची छेड काढणाऱ्या नराधमास चोप दिला होता. याशिवाय कोणत्याही महिला किंवा मुलीशी विकृतपणे वागाल तर त्याचीदेखील अशीच अवस्था केली जाईल, असा इशारा नांदगावकर यांनी त्या व्हिडीओतून दिला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Case filled against Nitin Nandgaonkar).

दरम्यान, याप्रकरणावरुन नितीन नांदगावकर यांनी काल (21 फेब्रुवारी) आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर प्रतिक्रिया दिली होती. “माता-भगिनींना नको तिथे हात लावून पळणाऱ्या विकृताला धडा शिकवल्याबद्दल मुंबई पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबद्दल मुंबई पोलिसांचे अभिनंदन”, असं नांदगावकर म्हणाले होते.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI