‘सेलिब्रिटींना शेतीतलं कळत नाही, त्यांनी कोणाच्यातरी दबावाखालीच ट्विट केले असेल’

केंद्र सरकारच्या बाजूने सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या ट्विटविषयी नाराजी व्यक्त केली. सेलिब्रिटींनी अशी ट्विटस करायला नव्हती पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले. | Nawab Malik

'सेलिब्रिटींना शेतीतलं कळत नाही, त्यांनी कोणाच्यातरी दबावाखालीच ट्विट केले असेल'
nawab malik

मुंबई: समाजातील सेलिब्रिटींना कृषी क्षेत्राविषयी काहीच समजत नाही. याचा अर्थ त्यांनी कोणाच्यातरी दबावाखाली ही ट्विटस केली असावीत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली. (Nawab Malik on celebrities tweet about farmers protest)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या बाजूने सेलिब्रिटींकडून करण्यात आलेल्या ट्विटविषयी नाराजी व्यक्त केली. सेलिब्रिटींनी अशी ट्विटस करायला नव्हती पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारलाही लक्ष्य केले. कायद्यात बदल किंवा सुधारणा करायच्या असतील तर सर्वांना विश्वासात घ्यावे. मॉडेल अ‍ॅक्ट आणि आताचा कृषी कायदा यामध्ये फरक आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

‘फासे फिरणार नाहीत, महाविकासआघाडी सरकार 25 वर्षे टिकेल’

नारायण राणे यांनी 20 वर्षे फासे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आजवर कधीच यश आले नाही. त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनाही फासे पलटवणे जमणार नाही. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार 25 वर्षे टिकेल, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार

पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगण, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचं कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.

संबंधित बातम्या:

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

विद्रोही साहित्य संमेलानाचे ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रण, ग्रेटा महाराष्ट्रात येणार का?

सेलिब्रिटींना मेंदू नाही काय; संजय राऊत संतापले

(Nawab Malik on celebrities tweet about farmers protest)

Published On - 4:18 pm, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI