AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, रविवारी लोकल उशिरा धावणार , काही फेऱ्या रद्द

मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 24 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक जाहीर, रविवारी लोकल उशिरा धावणार , काही फेऱ्या रद्द
लोकल ट्रेन
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 7:01 PM
Share

मुंबई: मध्य रेल्वेकडून रविवारी तांत्रिक कारणांमुळं मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग यांच्याकडून रविवारी 24 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

ठाणे- कल्याण अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत, मुलुंड येथून सकाळी10.43 ते दुपारी3.46 पर्यंत सुटणा-या डाउन धीमी/अर्धजलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील व ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.37 ते दुपारी 3.41 पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील व डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येऊन वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशीराने आगमन/सुटतील.

काही फेऱ्या रद्द

पनवेल- वाशी दरम्यान अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर- खारकोपर सेवा प्रभावित नाही; नेरुळ- खारकोपर सेवा रद्द राहतील) पनवेल येथून सकाळी 10.49 ते सायंकाळी 4.01 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 या वेळेत बेलापूर/पनवेल करीता डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

पनवेल येथून सकाळी 9.01 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

नेरूळ येथून सकाळी 10.15 ते दुपारी 2.45 या वेळेत खारकोपर करीता सुटणा-या डाउन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी 10.45 ते दुपारी 3.15 या वेळेत नेरूळ करीता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधी दरम्यान बेलापूर आणि खारकोपर दरम्यान सेवा वेळापत्रकानुसार चालतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. हे देखरेख मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

इतर बातम्या:

Maharashtra School Reopen : राज्यात सरसकट शाळा सुरु करण्याच्या हालचाली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होणार

VIDEO | अविघ्न टॉवर आग आणि एकाचा मृत्यू प्रकरण; पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले चौकशीचे आदेश

Central Railway announced Mega Block on sunday 24 october check details here

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.