VIDEO | अविघ्न टॉवर आग आणि एकाचा मृत्यू प्रकरण; पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले चौकशीचे आदेश

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी 30 वर्षीय अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी एका बाल्कनीतून दुसरीकडे जाण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळला.

VIDEO | अविघ्न टॉवर आग आणि एकाचा मृत्यू प्रकरण; पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले चौकशीचे आदेश
अविघ्न टॉवर आग आणि एकाचा मृत्यू प्रकरण; पालकमंत्री अस्लम शेखनी दिले चौकशीचे आदेश
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 6:02 PM

मुंबई : करी रोड येथील हायप्रोफाईल इमारत अविघ्न टॉवरला आज सकाळी आग लागली. या आगीतून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना तोल गेल्याने इमारतीतून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या आग आणि मृत्यू प्रकरणी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्यास आणि या घटनेला कोणीही जबाबदार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अस्लम शेख यांनी सांगितले. हायराईज इमारतीमध्ये पाण्याच्या पाईपमध्ये प्रेशर नाही म्हणून आग विझवण्यास वेळ लागला. लवकरच अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन धोरण ठरविणार. लोकल फायर स्टेशनला फॉर्म सबमिट करणं, फायर फायटींग सिस्टीम कार्यक्षम करणं, फायरसेफ्टीसाठी प्रशिक्षित कर्मचारी ठेवणं गरजेचं असल्याचे अस्लम शेख पुढे म्हणाले. (Guardian minister aslam shaikh orders inquiry into avighna tower fire and death of one)

इमारतीला आग लागल्यानंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी 30 वर्षीय अरुण तिवारी इमारतीच्या बाल्कनीत गेला. मात्र जीव वाचवण्यासाठी एका बाल्कनीतून दुसरीकडे जाण्याच्या नादात हात सुटून तो थेट खाली कोसळला. दुर्दैवाने जमिनीवर पडून त्याला प्राण गमवावे लागले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी काय सांगितलं?

अग्निशमन दलाचे जवान शिडी लावून चढेपर्यंत अरुण तिवारी याचा हात निसटला आणि तो खाली पडला. बहुतेक 19 व्या मजल्यावर फर्निचरचं काम सुरु होतं. तिथे ठिणगी उडून आग लागल्याची माहिती आहे. सोसायटीतील रहिवासी सांगतात की त्यांची वॉटर सिस्टम चालू नव्हती. दरवेळी महापालिका काय करेल, सगळ्या सिस्टम आहेत. पण सिस्टम वर्किंगमध्ये ठेवली नाही. इमारतीचे जे कोणी मॅनेजमेंट आहेत, ते प्रथमदर्शनी दोषी दिसत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल काय म्हणाले?

अविघ्न इमारतीच्या 19 व्या आणि 20 व्या मजल्यावर आग जास्त पसरली. काहीच मिनिटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. आग विझवण्यावर आणि रहिवाशांच्या सुटकेवर जास्तीत जास्त भर दिला. याप्रकरणी जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करु. अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणारच, कुणालाही अभय नाही. आगीची संपूर्ण चौकशी केली जाईल, चौकशीनंतर दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिलं. (Guardian minister aslam shaikh orders inquiry into avighna tower fire and death of one)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.