AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर आणि ट्रान्स हार्बरलाईनवर मेगाब्लॉक

मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) आणि ट्रान्सहार्बर (Trans Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी, हार्बर आणि ट्रान्स हार्बरलाईनवर मेगाब्लॉक
रविवारी मेगाब्लॉक
| Edited By: | Updated on: Feb 13, 2022 | 6:57 AM
Share

मुंबई: मुंबई लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आज हार्बर (Harbour) आणि ट्रान्सहार्बर (Trans Harbour) मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तर मध्य आणि पश्चिम या मेन लाईनवर मेगा ब्लॉक नाही, असं रेल्वे विभागाकडून कळवण्यात आलं आहे. मध्य रेल्वे आज ट्रान्स-हार्बर आणि हार्बर लाईनवर मेगाब्लॉक घेणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे. मध्ये रेल्वेकडून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.19 वाजेपर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलसाठी डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलहून सकाळी 10.15 ते सायंकाळी 4.09 या वेळेत ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप सेवा बंद राहतील.

कोणत्या सेवा बंद राहणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत सेवा बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडला येथून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 9.55 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत बंद राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.06 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिनांक आज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. आज मेन लाईनवर मेगाब्लॉक असणार नाही. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

इतर बातम्या:

13 February 2022 Panchang | 13 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या रविवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Maharashtra News Live Update : भिवंडी शहरातील फैजान कंपाऊंड परिसरातील भंगार गोदामाला भीषण आग

Central Railway take Mega Block on Trans Harbour and Harbour line no mega block on main line

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.