AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॅनर्स लावू नका, प्रतिक्रिया देऊ नका; ‘त्या’ वादानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यकर्त्यांना तंबी

महाराष्ट्रात समान नागरी कायदा तातडीने लागू व्हावा ही आमची भूमिका आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार लवकरच पाऊल उचलेल अशी आशा आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

बॅनर्स लावू नका, प्रतिक्रिया देऊ नका; 'त्या' वादानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची कार्यकर्त्यांना तंबी
chandrashekhar bawankuleImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 15, 2023 | 2:55 PM
Share

मुंबई : शिंदे गट आणि भाजपमध्ये सध्या बॅनरवार सुरू झाला आहे. खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच हा पोस्टरवार सुरू आहे. भाजपने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर हा वाद आणखीनच वाढला. दोन्ही पक्षांकडून रोज पोस्टर लावून एकमेकांवर तोंडसुख घेतलं जात असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे. पोस्टर लावू नका, प्रतिक्रिया देऊ नका, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

आम्ही सत्तेसाठी एकत्र नाही तर महाराष्ट्र विकासात क्रमांक एकवर राहावा आणि हिंदुत्वाचा विचार वाढावा यासाठी एकत्र आलो आहोत. त्यामुळे फोटो, बॅनर, जाहिरात याला काही अर्थ नाही. कार्यकर्ते अतिउत्साहात काही गोष्टी करतात. मात्र काहीही झालं तरी भाजपा-शिवसेना युती राहणार. कुणीही बोलू नये, बॅनर लावू नये आरोप करु नये, अशा सूचना मी अध्यक्ष म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

बोर्ड निर्णय घेणार

भाजप आणि शिवसेना युतीतील जागा वाटपावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीतील जागा वाटपाबाबत आमचा केंद्रीय पार्लमेंट्री बोर्ड निर्णय घेईल. बाकीच्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. मविआमध्ये समन्वय नाही. सत्तेसाठी ते एकत्र होते. निवडणूकीच्या ‘तोंडावर दिल के तुकडे हुये हजार’ अशी त्यांची परिस्थिती होईल, असा दावाही त्यांनी केला.

दोन्ही नेते प्रगल्भ

देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरमध्ये वेगवेगळ्या कारमधून गेले. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. वेगळ्या कारमध्ये का बसले या चर्चेला काही अर्थ नाही. दोन्ही नेते प्रगल्भ आहेत. कपट कारस्थान त्यांच्या मनात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आशिष देशमुख भाजपमध्ये

यावेळी त्यांनी काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख भाजपमध्ये येणार असल्याचं अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे. येत्या 18 तारखेला काँग्रेस नेते आशिष देशमुख भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे देशमुख के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गृहखात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न

नितेश राणे हे आधीच संजय राऊत प्रकरणावर बोलले. संजय राऊतांना धमक्या या गृहखात्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं नितेश राणे यांनी आधीच सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याला बदनाम करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. त्यासाठीच वेगवेगळे प्रकरण तयार केले जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.