AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण निर्णयाआधीच छगन भुजबळ यांचा थेट शिंदे सरकारलाच इशारा; तर ओबीसीही…

मराठा आरक्षणावर सध्या तरी हवा तसा तोडगा निघालेला नाही. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. ते मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचले आहेत. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. असं असताना मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

आरक्षण निर्णयाआधीच छगन भुजबळ यांचा थेट शिंदे सरकारलाच इशारा; तर ओबीसीही...
Chhagan Bhujbal
| Updated on: Jan 26, 2024 | 6:13 PM
Share

मुंबई | 26 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा आज वाशीमध्ये पोहोचला आहे. मनोज जरांगे आपल्या मांगण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन उपोषणाला बसणार आहेत. ते आजच आझाद मैदानाच्या दिशेला निघणार होते. पण सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर दाखवला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सगेसोयरेच्या मुद्द्याबाबतचा नवा जीआर काढावा, असं आवाहन सरकारला केलं. मनोज जरांगे यांनी अध्यादेशासाठी सरकारला आज रात्रपर्यंतचा वेळ दिला आहे. सरकारने नवा जीआर तयार केला नाही तर उद्या लाखो मराठ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर धडकेल, असं मनोज जरांगे म्हणाले. एकीकडे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचं म्हटलं. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल’

राज्य सरकारने मनोज जरांगे यांना आज महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यभरात 57 लाख मराठ्यांची कुणबी नोंद सापडली आहे. त्यापैकी 37 लाख मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याची माहिती सरकारने मनोज जरांगे यांना दिलं. मनोज जरांगे यांनी सर्व मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ओबीसी समाजावर अन्याय झाल्यास आंदोलन सुरु होणार, असं छगन भुजबळ म्हणाले. सरकारने दोन्ही बाजूचा विचार करुन योग्य निर्णय घ्यावा, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. “ओबीसींवर अन्याय झाला असं समजलं तर ओबीसींकडूनही आंदोलन सुरू होईल. त्यामुळे सरकार दोन्ही बाजूने विचार करून निर्णय घेईल. जी मते चुकीची आहेत, त्याला आम्ही विरोध करतो. ते करणारच”, असं छगन भुजबळ यावेळी ठामपणे म्हणाले.

छगन भुजबळ आणखी काय म्हणाले?

“कायद्याच्या कसोटीत जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजकाल कुणीही कोर्टात जातो त्याची चिरफाड होते त्यामुळे कायद्यात काय बसेल त्यानुसार होईल. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असे माझे देखील म्हणणे आहे पण ओबीसींवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. उद्या ओबीसीवर अन्याय झाला असे झालं तर निश्चितपणे ओबीसी समाजाचे देखील आंदोलन सुरू होईल. दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील. आम्ही आमची मतं जाहीर सभेतून मांडतो आणि आम्ही त्याला विरोध देखील करतो आणि आम्ही ती मांडू”, असं छगन भुजबळ म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.