SARTHI | मराठा समाजात एकी हवी, विजय आपलाच : छत्रपती संभाजीराजे

बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यावर ट्विट करत छत्रपती संभाजीराजेंनी समाधान व्यक्त केलं

SARTHI | मराठा समाजात एकी हवी, विजय आपलाच : छत्रपती संभाजीराजे
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 9:45 PM

मुंबई : मराठा समाजात एकी हवी, समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं (Chhatrapati Sambhajiraje Tweet), असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. सारथी संस्थेच्या बैठकीनंतर अजित पवारांनी सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. या बैठकीनंतर अवघ्या 2 तासात सारथी संस्थेला 8 कोटी रुपये देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं. त्यावर ट्विट करत छत्रपती संभाजीराजेंनी समाधान व्यक्त केलं (Chhatrapati Sambhajiraje Tweet) आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

मराठा समाजात एकी हवी : छत्रपती संभाजीराजे

“सारथी! दोन तासात 8 कोटी रुपयाचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करुन घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करुन घेता येतं. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल”, असं ट्विट छत्रपती संभाजीराजे यांनी केलं.

दोन तासात सारथी संस्थेला 8 कोटी, परिपत्रक जारी

मराठा समाज समन्वयकांसोबतच्या बैठकीत वाद झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना आपल्या दालनात बोलावून बैठक घेतली. यावेळी अजित पवार यांनी संभाजीराजे यांना आपल्यासोबत समोर मंचावर बसवले. या बैठकीत मंत्री विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, सचिन सावंत हे देखील उपस्थित होते.

“सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं”, असं अजित पवार या बैठकीदरम्यान म्हणाले. तसेच, सारथीला 8 कोटी उद्याच दिले जातील, असं अजित पवार म्हणाले होते. मात्र, बैठकीनंतर अवघ्या दोन तासांच्या आत सारथीला 8 कोटी देण्याचं सरकारी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

Chhatrapati Sambhajiraje Tweet

बैठकीत गदारोळ

अजित पवार यांनी सारथीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजेंना स्वतः फोन करुन बोलावलं होतं. मात्र, बैठकीत संभाजीराजे यांना खाली बसवल्याचा मुद्दा उपस्थित करत संभाजीराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातला. त्यामुळे मराठा समन्वयकांसोबत सुरु झालेली बैठक लगेचच आटोपली. विशेष म्हणजे यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी आपण दालनात बोलू असं म्हणत बैठक सोडली. यानंतर मराठा समाजाच्या समन्वयकांनी जाणून बुजून छत्रपती संभाजीराजेंचा अपमान केल्याचा आरोप केला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले, “मी समाजासाठी आलोय. मला खाली बसण्यात कसलाही अपमान वाटत नाही. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.”

संभाजीराजे यांनी आवाहन करुनही त्यांच्या समर्थकांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर अजित पवारांनी चूक सुधारत संभाजीराजेंना वरती येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या ओळीत बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना न गोंधळ घालण्याचं आवाहन केलं. आपल्याला समाज महत्वाचा आहे. समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Chhatrapati Sambhajiraje Tweet

संबंधित बातम्या :

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ, संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

SARTHI Meeting: सारथी संस्थेला 8 कोटींची मदत, अजित पवारांची घोषणा, वादावर पडदा

अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.