AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप

तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडूंनी केलाय. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर नायडूंनी हा आरोप केलाय. दरम्यान चंद्राबाबू दिशाभूल करत असल्याचं म्हणत जगनमोहन रेड्डींनी सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान यावरुन महाराष्ट्रातही राजकारण तापलंय.

तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर, चंद्राबाबू नायडूंचा गंभीर आरोप
| Updated on: Sep 20, 2024 | 10:19 PM
Share

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी जगन मोहन रेड्डींवर केलाय. नॅशनल डेअरी रिपोर्टच्या तपासणीतही लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. दरम्यान यानंतर केंद्र सरकारनं मंदिर समितीकडून अहवाल मागितलाय.

तिरुपती मंदिरातील लाडूत चरबी मिळाल्याची पुष्टी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डनं केली. जगनमोहन रेड्डींच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या प्रसादाच्या लाडूत तुपाऐवजी चरबीचा वापर केल्याचा आरोप, चंद्राबाबू नायडूंच्या दाव्यामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला. आमचं सरकार आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली-चंद्राबाबू

मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही सुधारला-चंद्राबाबू. तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रकरणावरुन महाराष्ट्रातलं राजकारणही चांगलंच तापलंय. मविआचं सरकार आल्यास पंढरपूर, शिर्डीच्या मंदिरातही लाडूंमध्ये भेसळ पाहायला मिळणार असा आरोप भाजपच्या सुनील देवधरांनी केलाय.

भाजपचे सुनील देवधरच नव्हे शिंदे गटानं देखील या प्रकरणावरुन महाविकास आघाडीला सवाल केलाय. तसंच ठाकरे गटानं या संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी श्रीकांत शिंदेंनी केलीय. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केलेल्या आरोपानंतर केंद्रानं मंदिर समितीकडून अहवाल मागितलाय. दरम्यान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दिशाभूल करत असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींनी त्यांच्यावरचे आरोप फेटाळले आहेत.

भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर
शिंदेंनी कसलं बंड केल? घंटा...राऊतांच्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर.
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.