AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“स्वाभिमान, क्रांतिदिन, उठावदिन शाखा शाखांमधून साजरा करुया”; एकनाथ शिंदे यांचा नेमका रोख कोणाला…

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात परदेशी गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र नंबर एकवर होता. तर त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र या परिस्थितीचे दयनीय अवस्था झाली असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

स्वाभिमान, क्रांतिदिन, उठावदिन शाखा शाखांमधून साजरा करुया; एकनाथ शिंदे यांचा नेमका रोख कोणाला...
| Updated on: Jun 19, 2023 | 11:26 PM
Share

मुंबई : आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र एक नंबरला आले, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीमुळे देशाबरोबरच जगात महाराष्ट्राचं कौतुक झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी आजच्या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांनी महाविकास आघाडीवरही सडकून टीका केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना राज्य अधोगतीच्या मार्गावर होते. लोकहिताच्या असलेल्या अनेक योजना या उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बंद पाडल्या गेल्या.

त्यांनी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही योजना मंजूर करण्यासाठी त्यांनी हातात कधीच पेन धरला नसल्याचे सांगत ते कधी मंत्रालयातच गेले नाहीत असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला.

‘मविआ’ने राज्याचा विकास थांबवला

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडीच्या सरकारने राज्याचा विकास थांबवून ठेवला. राज्याच्या विकासाच्या योजना योग्य प्रकारे का राबवल्या गेल्या नाहीत असा सवालही त्यांनी विरोधकांना केला आहे. एकनाथ शिंदे यांनी रिक्षा ड्रायव्हर ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास सांगताना मला हे पद सहजा सहजी न मिळता ते माझ्या कष्टानं मिळवलं असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर त्यांनी बोट ठेवताना त्यांनी लोकहिताच्या योजना उद्धव ठाकरे यांच्याकडूनच बंद करण्यात आल्याने त्याचा फटका राज्यातील साान्य जनतेला बसला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य संकटात असतानाच…

एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीचा फटका बसला होता, त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य संकटात असतानाच उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही विकासाच्या आणि प्रगतीचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. सध्या बिपरजॉय वादळाचा फटका गुजरात आणि राजस्थानला बसला आहे. या परिस्थितीमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमध्ये तळ ठोकला होता. कारण त्यांना लोकांची काळजी होती.

केंद्र सरकारची जोड

त्यामुळे सध्या राज्यात डबल इंजिनचे सरकार असून त्याला जोड केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता महाराष्ट्राचा विकास गतीने होत असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे त्यांनी आभारही मानले आहेत. ज्या काळात जगाची अर्थव्यवस्था बिघडली होती. त्याकाळात आपल्या देश अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या नंबरवर होता. तर नरेंद्र मोदी यांच्यामुळे आता पाचव्या नंबरवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘या’ परिस्थितीचे दयनीय अवस्था

तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात परदेशी गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र नंबर एकवर होता. तर त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मात्र या परिस्थितीचे दयनीय अवस्था झाली असल्याची खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

शिवसेनेच्या वर्धापना दिनादिवशीच त्यांनी सांगितले की,  स्वाभिमान, क्रांतिदिन, उठावदिन आता शाखा शाखांमधून साजरा करणार असून राज्याला विकासाची नवी दिशा दाखवण्याची आता वेळ आहे असं मतही त्यांनी यावेळी मांडले.

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...