AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana : या कागदपत्रांशिवाय eKYC अपूर्ण, लागलीच पूर्ण करा प्रक्रिया, नाहीतर थांबणार हप्ता

Ladki Bahin Yojana eKYC documents : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्येक महिलेला आधार, उत्पन्नाचा दाखला आणि बँकेची सविस्तर माहिती असे दस्तावेज जमा करावे लागतील. 1500 रुपये पात्र महिलेच्या खात्यात जमा व्हावे हा सरकारचा प्रयत्न आहे.

Ladki Bahin Yojana : या कागदपत्रांशिवाय eKYC अपूर्ण, लागलीच पूर्ण करा प्रक्रिया, नाहीतर थांबणार हप्ता
| Updated on: Sep 30, 2025 | 8:37 AM
Share

Chief Minister Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महिलांना मोठा दिलासा दिला. गेल्या वर्षभरात त्यांच्या खात्यात 18 हजारांची रक्कम जमा झाली आहे. या योजनेतंर्गत 1500 रुपये दरमहा पात्र महिलांच्या खात्यात जमा होतात. पण गेल्या काही महिन्यात या योजनेत अनेक घुसखोर घुसल्याचे समोर आले. काही पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. तर सरकारी कर्मचारी महिलांनी योजनेत हात धुवून घेतल्याचे समोर आले. योजनेला विविध निकष लावण्यात आले आहेत. या योजनेला लागलेली घुसखोरीची कीड दूर करण्यासाठी आता ई-केवायसीची (e-KYC) सक्ती करण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहे, हे समजून घ्या.

कोण-कोणती कागदपत्रं आवश्यक?

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील कागदपत्रं असणं गरजेचे आहे. :

  • आधार कार्ड
  • पासरपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याची सविस्तर माहिती
  • नमूद केलेली इतर कागदपत्रं

eKYC करण्याची प्रक्रिया

सरकारचे या योजनेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in आहे. यावर अथवा ई महासेवा केंद्रावर महिलांना ईकेवायसी पूर्ण करता येणार

अशी करा प्रक्रिया पूर्ण

  • साईटवर जा. ई-केवायसीवर क्लिक करा
  • नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक नोंदवा
  • मागितलेली कागदपत्रं अपलोड करा. सबमिट करा. त्यानंतर कागदपत्रं जमा झाल्याची खात्री करा

दोन महिन्यात पूर्ण करा ई-केवायसी

लाडकी बहीण योजनेविषयी सरकार दरबारी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. आता प्रत्येक लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याविषयीची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. अर्थात ई-केवायसी करण्यासाठी सरकारने मोठी मुदत दिली आहे. कारण आता सणासुदीचे दिवस आहेत. महिलांवरील कामाचा ताण पाहता केवायसी प्रक्रियेसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींना 1 लाखांचं बिनव्याजी कर्ज

लाडकी बहीण योजनेत 1 लाखांपर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्यात येत आहे. सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरामध्ये लागू आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकरच योजना लागू होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करता येणार आहे. सध्या मुंबई बँकेने 3 सप्टेंबरपासून ही योजना लाडक्या बहिणींसाठी कर्ज पुरवठा सुरू केला आहे. मुंबईसह आजुबाजूच्या लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होणार आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.