AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेसाठी शिंदेंचा ‘सेंच्युरी प्लॅन’; किती जागा लढायच्या अन् किती जिंकायच्या, सगळं-सगळं ठरलंय

Ekanth Shinde Planning For Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी सगळेच पक्ष तयारीला लागलेत. शिवसेना पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. या निवडणुकीचं शिवसेनेचं प्लॅनिंग काय आहे हे समोर आलं आहे. शिंदे गटाचं प्लॅनिंग काय? वाचा सविस्तर...

विधानसभेसाठी शिंदेंचा 'सेंच्युरी प्लॅन'; किती जागा लढायच्या अन् किती जिंकायच्या, सगळं-सगळं ठरलंय
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
| Updated on: Jul 18, 2024 | 5:51 PM
Share

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशात सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी विधानसभेसाठी रणनिती आखायला सुरुवात केलीय. अशातच शिवसेना शिंदे गटाचंही प्लॅनिंग झालंय. विधानसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सेंच्युरी प्लॅन’ केला आहे. शिवसेनेने महायुतीत 100 जागांवर दावा केला आहे. या 100 जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे. त्यासाठी राज्यभरात शिवसेनेकडून 100 विधानसभा निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’निवासस्थानी शिवसेनेची आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनी काय सूचना दिल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या‘वर्षा’निवासस्थानी झालेल्या शिवसेनेची महत्वाची बैठक झाली. यात आगामी निवडणूक आणि पक्ष बांधणीवर जवळपार चार तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा. पक्षात नवे सदस्य येतील यावर भर द्या. सदस्य नोंदणीवर भर द्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करावी. प्रत्येकाने आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावं. आपल्याला आगामी निवडणुकीत चांगलं मताधिक्य मिळवायचं आहे. त्यासाठी सरकारची कामं, योजना लोकांपर्यंत पोहोचवा, असं एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

महायुतीबाबत काय म्हणाले?

शिवसेनेच्या या बैठकीत महायुतीबाबतही चर्चा झाली. महायुतीत बेबनाव होणार नाही याची काळजी सर्व आमदारांनी घ्यावी. युती असल्यामुळे एखाद्यावेळेला जागांची अदलाबदल करावी लागेल. पण जागेची अदलाबदल झाल्यास मनाची तयारी ठेवावी लागेल. आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवारांनाही चांगलं सहकार्य करा, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्यात. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिवाय आगामी निवडणुकीत कोणता- पक्ष किती जागा लढणार आणि किती जागा जिंकणार, हे देखील येत्या काळात स्पष्ट होईल.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.