AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर निर्णय झालाच! मुख्यमंत्र्यांकडून आणखी 3 मोठे निर्णय जाहीर, बळीराजाला सर्वात मोठा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये आर्थिक मदत, 40 नवीन तालुक्यांचा दुष्काळात समावेश, हमी भावाने चारा खरेदी आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची सोय या प्रमुख घोषणांचा यात समावेश आहे. अवैध पाणी उपसा थांबवून शाळा फी माफीचेही निर्देश दिले आहेत, ज्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अखेर निर्णय झालाच! मुख्यमंत्र्यांकडून आणखी 3 मोठे निर्णय जाहीर, बळीराजाला सर्वात मोठा दिलासा
cm devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2026 | 12:58 PM
Share

दुष्काळाने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याच बरोबर फडणवीस यांनी आणखी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. एक म्हणजे दुष्काळी तालुक्यात आणखी 40 नव्या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरं म्हणजे, रब्बी हंगामात चाऱ्याची लागवड करणाऱ्या किंवा चाऱ्याचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून सरकार चारा हमी भावाने खरेदी करणार आहे. तिसरं म्हणजे, दुष्काळी भागाला लागतील तेवढे टँकर्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली. राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर काही तालुक्यातून तक्रारी आल्या होत्या. आता पुन्हा संपूर्ण ट्रिगर वन आणि ट्रिगर टूचा आढावा घेऊन 305 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे दुष्काळी तालुक्यात आणखी 40 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्या भागातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे, त्या भागाला दुष्काळाच्या 12 सवलती देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते मीडियाशी संवाद साधत होते.

चाऱ्यासाठी मोठा निर्णय

चाऱ्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करत आहोत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही चाऱ्याचा आढावा घेतला आहे. काही भागात चाऱ्याची 90 दिवसाची उपलब्धता आहे. काही भागात सहा ते सात महिन्याची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त चारा उपलब्ध झाला पाहिजे, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. धरण क्षेत्र परिसरात चाऱ्याची लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्यांच्या विहिरीला पाणी आहे, त्यांनी रब्बी हंगामात ज्वारीचं पीक घ्यावं किंवा चाऱ्याची पिकं घ्यावीत. चाऱ्याची पिकं घेतली किंवा चाऱ्याची लागवड केल्यास सरकार सर्व चारा हमी भावाने विकत घेणार आहे, तशी आज आमची चर्चा झाली आहे. त्यासाठी लवकरच निर्णय करून घोषणा केली जाईल. रब्बीच्या हंगामात चाऱ्याची पिकं किंवा चारा झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे, असं फडणवीस म्हणाले.

लागतील तेवढे टँकर देणार

पिण्याच्या पाण्यासंदर्भात टँकरची संख्या वाढत आहे. मराठवाड्यात बहुतेक भागात ऑब्सर्व्हेशन वेलमध्ये पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे. जेव्हा पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा कमी असते, तेव्हा आपल्याला ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून टँकर लावावा लागतो. त्यामुळे आम्ही टँकर देत आहोत. लागतील तेवढे टँकर देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, या टँकर्सवर जीपीएस पद्धतीने ट्रॅकिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचं आहे. त्यामुळे 16 हजार बेकायदा नळ कनेक्शन कापलं आहे. यापुढेही जर अवैध पाणी उपसा केला तर त्याचं कनेक्शन कापलं जाणार आहे. हा अत्यंत कठोर निर्णय आहे. पण पिण्याचं पाणी राखून ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

बँका आणि सोसायट्यांना कडक आदेश

शालेय फी माफीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. फी माफीचा जीआर काढला होता. पण 1992पासून त्या जीआरमध्ये काही अटी होत्या. त्यामुळे त्याचा सर्वांना फायदा होत नव्हता. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्या अटी काढल्या आहेत. सरसकट निर्णय लागू केला आहे. जिल्हा बँका असतील, सोसायट्या असतील सर्वांना कडक आदेश दिले आहेत. कुणालाही तगादा लावू नका. काही लोकं अतिउत्साह दाखवत आहेत. त्यांनी अति उत्साह दाखवू नये, असे आदेश दिले आहेत. खासगी बँकांशीही चर्चा सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!