मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेत आजपासून हेरिटेज वॉक उपक्रम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. (cm uddhav thackeray addressed in heritage walk programme in bmc)

मी विधानसभेत तुमच्यामुळे; तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पालिकेने हेरिटेज वॉक सुरू करून हा ऐतिहासिक ठेवा नागरिकांसाठी खुला केला आहे. दर शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांना पालिकेत येऊन हेरिटेज वॉक करता येणार आहे.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 7:44 PM

मुंबई: मुंबई महापालिकेत आजपासून हेरिटेज वॉक उपक्रम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी महापालिकेशी संबंधित आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला. तसेच आजपासून मुंबई महापालिकेच्या भिंतीही त्यांचा इतिहास सांगतील, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. तसेच मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली. (cm uddhav thackeray addressed in heritage walk programme in bmc)

गॉथिक शैलीतील मुंबई महापालिकेची सफर पर्यटकांना करता यावी म्हणून मुंबई महापालिकेने आजपासून हे हेरिटेज वॉक सुरू केल आहे. या निमित्ताने पर्यटकांना ही ऐतिहासिक इमारत पाहता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव उपस्थित होते. महापालिकेत हेरिटेज वॉक केल्यानंतर महापालिका सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हा ऐतिहासिक वारसा जपूया

आजचा हा कार्यक्रम अत्यंत अनोखा आहे. आजपासून ही इमारत तिचा इतिहास सांगेल. भिंतीला कान असतात असं आपण म्हणतो. पण आता या पालिकेच्या भिंतींना कान लावल्यास या भिंतीही त्यांचा इतिहास सांगेल. त्यांची जडणघडण कशी झाली. या इमारतीत किती महत्त्वाचे निर्णय झाले. किती मातब्बर नेते येऊन गेले. याचा इतिहास या भिंती सांगतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ पालिकेच्या भिंतींनाच नाही तर इथल्या खुर्च्यांनाही वारसा आहे. या खुर्च्यांवर अनेक थोर व्यक्ती बसून गेले. त्यांनी त्यांचा काळ गाजवला. या पालिकेत महापुरुषांचे पुतळे आहेत. ते केवळ पुतळे नाहीत. त्या पुतळ्यांना काही अर्त आहे. केवळ पुतळे करायचे म्हणून केलेले नाहीत. त्या शिल्पाला अर्थ आहे. या मुंबईत एकूण आठ किल्ले आहेत. माहीम, धारावी, वांद्रे, वरळीचा किल्ला आहे. हा आपला वारसा आहे. हा अत्यंत संपन्न वारसा आहे. हा वारसा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

आठवणींना उजाळा

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिकेशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. मी 14 वर्षाचा असेन तेव्हा पालिकेत आलो होतो. पालिकेच्या गॅलरीत थांबलो होतो. ही गॅलरी न्याहळत होतो. मुख्यमंत्री होऊन याच सभागृहात महापौरांच्या जागेवर बसेल असं वाटलं नव्हतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच एकत्र पालिकेत आल्याने हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी कोटी केली. मी विधानसभेत तुमच्यामुळे, तुम्ही महापालिकेत आमच्यामुळे आहात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

राज्यातीलच नव्हे तर परदेशातील पर्यटकांनाही मुंबई महापालिकेच्या इमारतीचा अभिमान वाटेल. त्यांच्या देशातील लोकांनाही ते पालिका बघण्याचा आग्रह करतील, इतकी अप्रतिम ही इमारत आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. (cm uddhav thackeray addressed in heritage walk programme in bmc)

पालिका इमारतीची ठळक वैशिष्ट्येः

>> मुंबई महानगरातील सुमारे दीड कोटी लोकसंख्येला नागरी सेवा-सुविधा देणाऱया बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण. >> ही इमारत म्हणजे मुंबई महानगराच्या नागरी सेवेचा व विकासाचा अबोल साक्षीदार आहे. >> भारतातील अग्रगण्य शहर (Urbs Prima In Indis) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगराचे प्रतिनिधीत्व या इमारतीचा 235 फूट उंचीचा मनोरा करीत आहे. >> फेड्रिक विल्यम स्टिव्हन्स या नामवंत वास्तुशिल्पकाराकडून मुख्यालय इमारतीचे संकल्पनाचित्र व आराखडे तयार. >> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे कायदे बनविणारे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड रिपन यांनी त्यावेळी इमारतीची कोनशिला बसवली. >> दिनांक 25 एप्रिल 1889 रोजी बांधकामास प्रारंभ. दिनांक 31 जुलै 1893 रोजी पूर्णत्वास. >> तत्कालीन मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मिळालेल्या 6600.65 चौरस वार जमिनीवर ही इमारत बांधण्यात आली. >> रावसाहेब सीताराम खंडेराव यांच्या देखरेखीखाली बांधकाम पूर्ण. ठेकेदार व्यंकू बाळाजी कालेवार यांनी अपेक्षित कालावधीत काम पूर्ण केले. >> इमारत बांधकामाचा खर्च रुपये 11 लाख 19 हजारv969 इतका झाला. मूळ अंदाजित खर्च रुपये 11 लाख 88 हजार 092 रुपयांच्या तुलनेत 68 हजार 113 रुपये इतका कमी खर्च झाला. बांधकाम पूर्ण करुन शिल्लक रक्कम सरकारजमा करण्यात आली. >> ही सर्वांगसुंदर व भव्य अशी इमारत गॉथिक वास्तूशास्त्र पद्धतीने बांधलेली आहे. त्यात पौर्वात्य व पाश्चात्त्य स्थापत्य कलेचा मनोहारी संगम. ठिकठिकाणी त्याचा प्रत्यय. >> या इमारतीमध्ये दिनांक 16 जानेवारी 1893 रोजी प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ. >> मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 प्रमाणे याच इमारतीतून कामकाज सुरु. >> मुख्यालयात सुमारे 68 फूट लांब, 32 फूट रुंद, 38 फूट उंचीचे ऐतिहासिक सभागृह हे आकर्षणाचा भाग. सभागृहात दोन प्रेक्षक दालनांचाही समावेश. तसेच तीन मोठी झुंबरही. >> सुमारे तीन दशकांपेक्षा जास्त काळ मुंबई महानगरपालिकेत नागरी हक्कांसाठी झगडत मुंबई महानगराच्या विकासाला दिशा देणारे असे सर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा दिनांक 23 एप्रिल 1923 रोजी महानगरपालिका मुख्यालयासमोर स्थापन. >> इमारतीचे मूळ स्वरुप आजही कायम. अंतर्गत रचना बदलताना मूळ स्वरुपाला कोणताही धक्का न लावता प्रयत्नपूर्वक या इमारतीचे बांधकाम व सौंदर्य जपण्यात येत आहे. (cm uddhav thackeray addressed in heritage walk programme in bmc)

संबंधित बातम्या:

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

मुंबई पालिकेच्या ऐतिहासिक इमारतीची सफर करा; पहिला मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना!

LIVE | राज्यात सक्षम विरोधक म्हणून काम करणार : देवेंद्र फडणवीस

(cm uddhav thackeray addressed in heritage walk programme in bmc)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.