जेव्हा उद्धव ठाकरे फडणवीसांकडे बघून म्हणाले, निर्लज्जपणाने का नाकारता? नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. (cm uddhav thackeray attack bjp over hindutva)

जेव्हा उद्धव ठाकरे फडणवीसांकडे बघून म्हणाले, निर्लज्जपणाने का नाकारता? नेमकं काय घडलं?; वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 4:47 PM

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट हिंदुत्व, बाबरी मशीद, शर्जील उस्मान, काश्मीर पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यापासून ते युती तुटण्यापर्यंतच्या मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपला थेट निर्लज्जच संबोधलं. मुख्यमंत्र्यांचं हे रौद्ररुप पाहून भाजप सदस्यही चिडीचूप होते. (cm uddhav thackeray attack bjp over hindutva)

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हिंदुत्वालाच हात घातला. तुम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तरी आठवण ठेवलीत त्याबद्दल तुमचे आभारीच आहोत. पण तुम्हाला आज बाळासाहेबांचे उमाळे येत आहेत. त्याच बाळासाहेबांच्या खोलीत भाजपचे नेते अमित शहा आणि आमच्यात चर्चा झाली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांना दाराबाहेर ठेवलं होतं. आतमध्ये मी आणि शहा होतं. या बंद दाराआड ठरलेली गोष्ट तुम्ही निर्लज्जपणे नाकारता… निर्लज्ज हा शब्द असंसदीय असला तरी मी तो वापरतो… हेच तुमचं हिंदुत्व… हेच तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम?, असा सवाल करतानाच बाळासाहेबांची खोली तुमच्यासाठी एखादी खोली असू शकते, पण आमच्यासाठी ते मंदिर आहे, असं मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना उद्देशून सांगितलं.

फडणवीसांना दरवाजाबाहेर का ठेवता

शहा आणि माझ्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. बंद दाराआड चर्चा सुरू होती. त्यावेळी फडणवीसांना दाराबाहेर ठेवण्यात आलं होतं. चर्चेत सहभागी करून घेतलं नव्हतं. फडणवीसांना भाजप नेत्यांनी दरवाजाबाहेर बसवून का ठेवले? हे आजपर्यंत मला कळलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

हिंदू म्हणूनच मरणार

2014मध्ये आपली युती तुटली तेव्हाही आम्ही हिंदू होतो. आजही मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार आहे, अशी गर्जना करतानाच मला हिंदुत्व शिकवू नका, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीशकुमारला जवळ केलं. रामविलास पासवानांना मांडीवर घेतलं हेच का तुमचं हिंदुत्व? शर्जिल उस्मानी उत्तर प्रदेशचं प्रोडक्ट्स आहे, आमचं नाही, असं ते म्हणाले.  (cm uddhav thackeray attack bjp over hindutva)

संबंधित बातम्या:

नारायण भंडारी, माधव भंडारी, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख आणि फडणवीसांची दिलगिरी

सुधीरभाऊंचं भाषण पाहिलं आणि नटसम्राट आठवला, पण कुणी किंमत देता का किंमत अशी स्थिती, मुख्यमंत्र्यांचे फटकारे

Maharashtra budget session 2021 LIVE | औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण करणारच, उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

(cm uddhav thackeray attack bjp over hindutva)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.