AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Uddhav Thackeray : गिरगावमधील दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कशी आहे गॅलरी?

'दर्शक गॅलरी'चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

Cm Uddhav Thackeray : गिरगावमधील दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, कशी आहे गॅलरी?
गिरगावमधील दर्शक गॅलरीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणImage Credit source: tv9
| Updated on: Apr 17, 2022 | 7:27 PM
Share

मुंबई : मुंबईकरांच्या सुविधा आणि पर्यटनांमध्ये आज एक मोठी भर पडली आहे. कारण मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात ‘गिरगाव चौपाटी’च्या उत्तर टोकाला एक सुसज्ज अशी गॅलरी (Girgaon Viewer Gallery) उभारण्यात आली आहे. कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत उभारण्यात आलेल्या ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले आहे.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. या दर्शक गॅलरी मुळे मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यकरणाचा सुंदर देखावा पाहता येणार आहेत, तसेच या सेल्फी पॉइंटमुळे अनेक सुंदर फोटोही काढता येणार आहेत. मुंबईकरांसाठी हे सुदर ठिकाण आजपासून खुलं झालं आहे.

कशी आहे गॅलरी?

  1. या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे आणि ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय, विहंगम व मनमोहक दर्शन घडविणा-या या गॅलरीची उभारणी करण्यात आली आहे.
  2. भरती – ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात आली आहे.
  3. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधीत परवानग्या काम सुरु करण्यायापूर्वीच प्राप्त झाल्या असून साधारणपणे 8 महिन्यांच्या कालावधीत ही गॅलरी आकारास आली आहे.
  4. ‘दर्शक गॅलरी’ अर्थात सदर ‘व्ह्युईंग डेक’वर एकाच वेळेस किमान 500 पर्यटकांना सागरी सौंदर्य न्याहाळता येणार आहे. तसेच ‘नेताजी सुभाष मार्ग’ अर्थात राणीच्या रत्नहाराप्रमाणे दिसणा-या ‘मरिन ड्राईव्ह’चे विहंगम दृश्य हे डोळ्याचे पारणे फेडणारे असणार आहे.
  5. या प्रकल्पासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधित परवानग्या प्राप्त करुन घेतल्या असून प्रकल्पाचा मूळ कालावधी 12 महिन्यांचा असून सुद्धा सदर प्रकल्प 8 महिन्यातच पूर्ण करण्यात आला आहे.
  6. सदर ठिकाणी विश्रांतीसाठी कल्पकतेने आसने मांडण्यात आली असून या ठिकाणी फुल झाडांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.
  7.  सदर ‘व्ह्युविंग डेक’च्या परिरक्षणाचे काम हे महानगरपालिकेतर्फेच करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे करण्यात आली आहे.

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी मुख्यमंत्री अजित पवार यांनीही या गॅलरीबाबत माहिती दिली आहे. हा खूप चांगला स्पॉट तयार करण्यात आला आहे. सकाळी साडेसहा ते संध्याकाळी अकरापर्यंत हे सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती यावेळी अजित पवारांनी दिली, तसेच प्रत्येक चांगल्या कामाला राजकीय विरोध करु नये, असेही ते म्हणाले. या गॅलरीच्या उभारणीसाठी सर्व परवागनग्याही घेण्यात आल्या आहेत. भरती असल्यास समुद्रात उभे असल्यासारखे वाटेल. सनराईज आणि सनसेट दोन्हींचा आनंद घेता येईल. मुंबई महापालिका आणि आदित्य ठाकरेंचा अशा चांगल्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दादारमध्येही असाच स्पॉट तयार करण्यात येणार आहे.आमचे नवे सहकारी आदित्य ठाकरे चांगली कामं करत आहेत. लाईट व्यवस्थाही चांगली करण्यात येत आहे, असे म्हणत अजित पवारांनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केले आहे.

Sadabhau Khot : चंद्रकांत पाटलांना अनेकांचा हिमालयात जाण्याचा सल्ला; आता सदाभाऊंनी पवारांनाही करुन दिली एका वक्तव्याची आठवण!

महाविकास आघाडीचा रायगडातील पहिला बळी, सुरेश लाड यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीत संभ्रमावस्था

Video : हलगीच्या तालावर खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा ठेका, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.