महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्ती मोडून काढलीच पाहिजे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण शिवरायांना मानतो. आपण झाशीच्या राणींचाही उल्लेख करतो. पण समाजात महिलांना अनेक विचित्र अनुभव येतात. महिलांना हे अनुभव येऊच नये... त्यातही शिवरायांच्या महाराष्ट्रात तर येऊच नाही यासाठी आपण सजर राहिलं पाहिजे.

महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्ती मोडून काढलीच पाहिजे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
cm uddhav thackeray inauguration Nirbhaya Squad
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 1:09 PM

मुंबई: आपला महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपण शिवरायांना (chhatrapati shivaji maharaj) मानतो. आपण झाशीच्या राणींचाही उल्लेख करतो. पण समाजात महिलांना अनेक विचित्र अनुभव येतात. महिलांना हे अनुभव येऊच नये… त्यातही शिवरायांच्या महाराष्ट्रात (maharashtra) तर येऊच नाही यासाठी आपण सजर राहिलं पाहिजे. महिलांवर अत्याचार करणारी सैतानी वृत्तीच मोडून काढली पाहिजे, असं सांगतानाच संस्कार आपोआप घत नाहीत. काहीवेळा कायद्याचा वचकही दाखवला पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या हस्ते निर्भया पथकाचं उद्घाटन पार पडलं. अभासी पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांचं अभिनंदनही केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरही भाष्य केलं. महिला कुठेही कमी नाहीत. त्या प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत आहेत. मात्र समाजातील काही घटनांमुळे त्या असह्य होतात. एखादी घटना घडते, दुर्घटना घडते अन् हल्लकल्लोळ माजतो.चर्चा होते आणि पुन्हा वातावरण शांत होते. या घटना घडूच नये. अशा घटना घडल्या तर आरोपींचा तिथल्या तिथे बंदोबस्त झाला पाहिजे. त्यासाठीची यंत्रणा आज आपण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून सुरू करत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाठिंबा अभासी नाही

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री अभासी पद्धतीने उपस्थित असल्याचा वारंवार उल्लेख केला गेला. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी कोटी केली. मुख्यमंत्री अभासी पद्धतीने उपस्थित आहे, असं माझ्या बद्दल सांगितलं गेलं. माझी उपस्थिती अभासी असली तरी पाठिंबा अभासी नाही, अशी कोटी मुख्यमंत्र्यांनी करताच एकच खसखस पिकली. मी पोलीस आयुक्तांना सांगतो तुम्ही पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तुम्ही मदत करत आहात. ही मदत चांगल्याच कामासाठी आपण वापरू. तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. अगदी शस्त्रांचीही मदत देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पोलीस दलाचं काम किचकट

मदत देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. पोलीस दलांचं काम किती किचकट आहे हे ऐकताना अंगावर थरार येतो. तुम्ही बोलत असताना ते जाणवत होतं, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी सर्व राष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसांचं अभिनंदन केलं. सर्व राष्ट्रपती पदक कमावणाऱ्या… मिळावणाऱ्या… पदक असंच मिळत नाही. त्यासाठी तुम्ही शौर्य गाजवलं, अशा शब्दात त्यांनी विजेत्यांचं कौतुक केलं.

जगही महाराष्ट्राकडून धडे घेईल

‘महिला सुरक्षा मार्गदर्शिका’ पुस्तिका आपण काढली आहे. ही पुस्तिका जास्तीत जास्त महिलांच्या हातात गेली पाहिजे. या सूचना नीट पाळल्या तर महाराष्ट्र महिला अत्याचार मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी अभासी पद्धतीने उपस्थित झालो आहे. तुम्हाला माझ्या शुभेच्छा. आपण मातृभक्त आहोत. देवदेवतांच्या रुपात आपण महिलांची पूजा करतो. महिलांचा रक्षण करणारा हा महाराष्ट्र आहे. आगामी काळात महिलांची सुरक्षा कशी करावी हे देशच नव्हे तर जगही आपल्या महाराष्ट्राकडून शिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

मनात मांडे खाऊ नका, गोव्यात सत्ता तर आमचीच येणार; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?

Republic Day : 26 जानेवारीलाच आपले संविधान का लागू केले होते? जाणून घ्या इतिहास

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.