कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह झालंय.

कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह, शुभारंभावेळीच अ‌ॅप झालं होतं डाऊन

रत्नागिरी :  कोव्हिड लसीकरणातील Co- win ॲप आजपासून पुन्हा अ‌ॅक्टिव्ह झालंय. शनिवारी लसीकरणाच्या शुभारंभावेळी अ‌ॅप डाऊन झाल्याने आरोग्य यंत्रणेचा मोठा खोळंबा झाला होता. आता अ‌ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन लसीकरणाला देखील सुरवात झालीय. (Co- win App Active Vaccination Started In Ratnagiri)

अ‌ॅपच्या माध्यमातून लस घेणाऱ्याची म्हणजेच लसीकरणाच्या लाभार्थ्याची माहिती थेट केंद्र सरकारला जात आहे. ऑनलाईन अ‌ॅपच्या माध्यमातून आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर आता सहज करु शकत आहेत. ॲप डाऊन झाल्याने लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना फोन वरून संपर्क केला जात होता. मात्र ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करु नयेत असे आदेश केंद्राकडून मिळाले होते.

केंद्राच्या आदेशानंतर ऑफलाईन लसीकरण बंद होतं. मात्र आजपासून आठवड्यातून चार दिवस कोरोना लस देण्यास पुन्हा सुरवात झालीय. आज Co Win अ‌ॅप सुरळीत सुरु असल्याचं पहायला मिळालं.

कोरोना लस देण्यास पुन्हा एकदा सुरवात झालीय. आठवड्यातून चार दिवल ही लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला शनिवारपासून भारतात सुरवात झाली.

केंद्राच्या आदेशानंतर खंडित झालेली लसीकरणाची मोहीम आजपासून पुन्हा सुरवात झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी कोरोनाची लस कोरोना लढा लढणाऱ्या फ्रन्टलाईन वर्कर्सना दिली जातीय. आजपासून सुरु झालेल्या लसीकरणात 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येक केंद्रावर ही लस दिली जातीय.

Co Win च्या तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती

कोरोना लसीकरणाबाबत केंद्राने सूचना केल्या आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची ऑफलाईन नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे कोविन अ‌ॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्या सुधारण्यासाठी 17 आणि 18 जानेवारीला लसीकरण स्थगित करण्यात आले होते. नागरिकांनी कोरोना लसीकरणाबाबत गैरसमज करू घेऊ नये, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं.

(Co- win App Active Vaccination Started In Ratnagiri)

हे ही वाचा

कोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन

लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Corona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI