AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी यार्डात क्रॉसओव्हरचे काम पूर्ण, असा होईल लाभ

पश्चिम रेल्वेने त्यांच्या अँधेरी यार्डात दोन क्रॉसओव्हरची उभारणी करण्याचे काम पूर्ण केले आहे. याकामामुळे आपातकालीन परिस्थितीत धिम्या डाऊन लोकलना डाऊन फास्ट मार्गिकेवर वळविणे सोपे होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी यार्डात क्रॉसओव्हरचे काम पूर्ण, असा होईल लाभ
crossoverImage Credit source: crossover
| Updated on: Jan 16, 2023 | 6:30 PM
Share

मुंबई : पश्चिम रेल्वेने अंधेरी यार्डात क्रॉसओव्हर लावण्याचे महत्वपूर्ण अभियांत्रिकी कार्य पूर्ण केले आहे. त्यामुळे जम्बो ब्लॉक दरम्यान गाड्यांचे परिचलन करण्यास फायदा होईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांचा फायदा होईल असे म्हटले जात आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई डीव्हीजनने अंधेरी यार्ड येथे क्रॉसओव्हर बसवण्याचे काम पूर्ण केले आहे.

हे अभियांत्रिकी कार्य 34 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी रेल्वेकडून विशिष्ट मंजूरी घेण्यात आली होती. डाऊन लोकल लाईनपासून फास्ट लोकल लाईन मार्गावर लोकल एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर वळविण्यासाठी एकूण दोन क्रॉसओव्हर तयार करण्यात आले आहेत. या दोन क्रॉसओव्हरची चाचणी ताशी 30 किमी प्रति वेगावर 11 व 12 जानेवारीला घेण्यात आली असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क प्रमुख सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानूसार नवीन क्रॉस ओव्हर सांताक्रुज (उत्तर) आणि गोरेगांव (दक्षिण) च्या दरम्यान अतिरिक्त डायव्हर्जन सुविधा ( डाऊन लोकल लाइन ते डाऊन फास्ट लाइन ) उपलब्ध करणार आहेत. ज्याने जम्‍बो ब्‍लॉकदरम्यान परिचालन सुधारण्यास मदत मिळणार आहे. 30 किमी प्रती तासांच्या या दोन्ही क्रॉसओव्हरमुळे लोकल ट्रेनचे त्वरीत वाहतूक करण्यास सहाय्य मिळणार आहे. या महत्वपूर्ण कामामुळे लोकल ट्रेनच्या वाहतूकीचे परिचलनात सुधार होणार आहे.

भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?
भाजपकडून 67 जणांची पहिली यादी जाहीर, कोणत्या वॉर्डमधून कोणाला संधी?.
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.