Devendra Fadnavis: काँग्रेस हे बुडते जहाज… राष्ट्रवादी, TMC विलिनीकरणाचा भाजपलाच होणार फायदा… फडणवीसांनी अख्खे गणितच मांडले
Devendra Fadnavis on Narendra Modi: राष्ट्रवादी काँग्रेस आणि टीएमसीसह देशातील अनेक घटक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis on Narendra Modi: तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह देशातील अनेक घटक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी याविषयीचे मोठे आवाहन सर्वच पक्षांना केले होते. दरम्यान मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याविषयी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी यावेळी काँग्रेसवर टीका करतानाच संजय राऊत यांना मोठा टोला हणाला.
काँग्रेस हे बुडते जहाज
या विलिनीकरणाबद्दल असे म्हणावे लागेल की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाणा. अशा पद्धतीने जो काँग्रेसचा ही नाही. जो राष्ट्रवादीचाही नाही. तो व्यक्ती बोलतो, असा टोला त्यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला. मग तुम्ही सर्व विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की हे पक्ष जे तुम्हाला दिसत आहेत. या पक्षाचे नेते इतके हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये ते पाय ठेवणार नाहीत. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. ते या बुडत्या जहाजात पाय ठेवतील असं मला वाटत नाही. तथापि, राजकारणात अतिशोयक्तीपूर्ण बोलायचं नसतं. मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जर पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्ष मागे हटेल तेवढी अतिरिक्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळेल. त्यामुळे या घडामोडींवर आमची कुठलीही प्रतिक्रिया नाही. आम्ही केवळ बघतो आहोत, वेट अँड वॉच, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देशात 6 कोटी महिला होणार लखपती
मोदी सरकारला 12 वर्षे पूर्ण झाली. या बारा वर्षात केंद्र सरकारने 360 डिग्रीचा बदल घडवला असे कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांची जंत्रीच वाचली. देशात 3 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आता 6 कोटी महिला लखपती होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही
मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकार हे बेदाग आहे असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. त्यांना आता चांगलं आयुष्य जगता येत आहे. त्यांना किमान दोन वेळेच्या जेवणाची चिंता नसावी यासाठी अन्नधान्य योजना चालू ठेवल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्जमाफीविषयी सबकमिटीची स्थापना
सरकारच्या सूचनेनुसारच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जनावरांसाठी सरकार वैरण उपलब्ध करून देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता कर्जमाफी केली आहे. सोयाबीन, कापसाच्या पॅटर्नमधून शेतकऱ्यांनी बाहेर पडावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ४० लाख शेतकऱ्यांना काही न करता कर्जमाफी दिल्याचे फडणवीस म्हणाले. आज तरी अर्थखातं आपल्याकडेच असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.