AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: कर्जमाफीसाठी अगोदर 50 हजारांची वसुली? रोहित पवारांचा आरोपांचा नवा बॉम्बगोळा… कर्जमाफीसाठी पंढरपूरमध्ये एल्गार

Rohit Pawar Hunger Strike: शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आमदार रोहित पवारांनी पंढरपूरमध्ये एल्गार पुकारला आहे. आमदार रोहीत पवार आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, आमदार रोहीत पवार यांच्याबरोबर आंदोलन स्थळी झाले दाखल आहेत.

Rohit Pawar: कर्जमाफीसाठी अगोदर 50 हजारांची वसुली? रोहित पवारांचा आरोपांचा नवा बॉम्बगोळा... कर्जमाफीसाठी पंढरपूरमध्ये एल्गार
रोहित पवार, शेतकरी कर्जमाफीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jun 12, 2026 | 11:58 AM
Share

Rohit Pawar Hunger Strike: शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा यामागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलनाची हाक दिली आहे. प्रशासनाने वाहतूक अडचणीचे कारण देत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे. तर आमदार रोहीत पवार आंदोलन स्थळी दाखल झाले आहेत. आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील हे सुद्धा आंदोलन स्थळी झाले दाखल आहेत. रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे सरसकट कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सरकार याप्रकरणी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्जमाफीसाठी आधी 50 हजार रुपये भरावे लागणार

या कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला लाख रुपये मिळणार असले तरी 36 लाख शेतकर्‍यांना अडचण निर्माण होऊ शकते. कर्जमाफी मिळवण्यासाठी आधी 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत. मग शेतकऱ्याला दोन लाख रुपये मिळणार आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तरी जाचक अट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करून 55 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली. कर्जमाफी पाहिजे, कर्ज वसूली आम्हाला नको आहे यासाठीचे आंदोलन आहे असे आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा द्या

शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. अनेक वर्षांपूर्वी साने गुरुजी यांनी सुद्धा पंढरपुरात विनापरवानगीचे आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांना यश आलं होतं. आम्ही सुद्धा त्यांच्याच आणि महापुरुषांच्या विचारानेच पुढे जात आहोत. त्यामुळे परवानगी दिली काय आणि नाही दिली काय आम्ही आंदोलन करणारच असे रोहित पवारांनी सांगितले.

आम्ही सामान्य, गरीब शेतकर्‍यांसाठी आंदोलन करत आहोत कुठल्याही खुर्चीसाठी किंवा मंत्री पदासाठी करत नाही. आम्ही ज्या जाचक अटी काढा म्हणत आहोत त्या शेतकर्‍यांसाठी अन्यायकारक आहेत का फायद्यासाठी आहेत त्या या नेत्यांनी सांगावे, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्या पद्धतीने लातूरमध्ये आजारी बैल शेतकऱ्याला दिला त्याच पद्धतीने आता जी दिलेली कर्जमाफी ही आजारी कर्जमाफी आहे अशी टीका रोहित पवार यांनी या कर्जमाफीवर केली. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ही कर्ज वसूली न करता शेतकर्‍यांची कर्जमाफी करा, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...