धारावीत कोरोना, नसीम खान यांचं तब्लिगींबाबत मोठे वक्तव्य

"धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव तब्लिग जमातीमुळे झाला असे बोललं जात होतं." याला काँग्रेस नेते नसीम खान यांनीही दुजोरा दिला (Nasim khan on Tablighi Corona dharavi slum) आहे.

धारावीत कोरोना, नसीम खान यांचं तब्लिगींबाबत मोठे वक्तव्य

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला (Nasim khan on Tablighi Corona dharavi slum) आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखण्यात येणाऱ्या धारावी झोपडपट्टीही कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. “धारावीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा फैलाव तब्लिग जमातीमुळे झाला असे बोललं जात होतं.” याला काँग्रेस नेते नसीम खान यांनीही दुजोरा दिला आहे.

नसीम खान यांचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना आवाहन करतानाचा (Nasim khan on Tablighi Corona dharavi slum) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात त्यांनी “धारावीत तब्लिगी जमातीमुळे कोरोनाचा फैलाव झाला असे दुजोरा देणारे वक्तव्य केले. त्यामुळे इतरांनी खबरदारी घ्यावी असे त्यांनी या व्हिडीओत म्हटलं आहे. जनतेला आवाहन करताना हा व्हिडीओ  व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सायनमधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकांनी घराबाहेर पडू नका. पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी आपल्यासाठी काम करत आहेत. त्यांना त्यांचे काम करु द्या. तुम्ही घराबाहेर पडू नका. जर तुम्ही घराबाहेर पडलात, तर तुम्हालाही कोरनाची लागण होईल, असे आवाहन नसीम खान यांनी केले आहे.

दरम्यान मुंबईत आतापर्यंत 377 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईचे आहे. तर त्या पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात 103 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 635 वरुन 661 वर गेली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.

तर गेल्या 24 तासात पुण्यात गेलेला हा दुसरा बळी असून महाराष्ट्रातील ‘कोरोना’बळींची संख्या 34 वर पोहोचली (Nasim khan on Tablighi Corona dharavi slum) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI