AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पालिकेला दोन आयुक्त नकोच; अस्लम शेख यांना काँग्रेस नेत्याचाच घरचा आहेर

मुंबई काँग्रेसकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असेही रवी राजा यांनी सांगितले. (Congress Opposes Aslam Sheikh demand)

मुंबई पालिकेला दोन आयुक्त नकोच; अस्लम शेख यांना काँग्रेस नेत्याचाच घरचा आहेर
| Updated on: Jan 10, 2021 | 3:54 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते आणि मंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी केली होती. या मागणीला काँग्रेस पक्षातून विरोध केला आहे. मुंबई महापालिकेत एकच आयुक्त असावा, अशी काँग्रेसची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते असलेल्या काँग्रेसच्या रवी राजा यांनी दिली आहे. (Congress Opposes Aslam Sheikh demand Two BMC Commissioner for mumbai)

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त असले पाहिजे, या अस्लम शेख यांच्या मागणीला काँग्रेस पक्षातूनच विरोध आहे. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मुंबई काँग्रेसकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असेही रवी राजा यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेत एकच आयुक्त असावा, ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी बोलूनच ही भूमिका मांडत आहे, असेही रवी राजा यांना सांगितले.

अस्लम शेख यांनी मंत्री म्हणून पत्रव्यवहार केला असला, तरी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही, असेही रवी राजा म्हणाले.

मुंबई महापालिकेत 7 परिमंडळ अधिकारी आणि तीन अतिरिक्त आयुक्त योग्य पध्दतीने काम पाहतात. मुंबई महापालिकेचे ऑफिस हे मध्यवर्ती भागात घ्यावं याला आमचा पाठिंबा असेल. मुंबईचं विभाजन होऊ देणार नाही. भाजपला आता फक्त आरोप करण्याचं काम शिल्लक आहे, असेही रवी राजा यांनी सांगितले.

काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडकावली

दरम्यान  मुंबई महापालिकेला दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडाकवून लावली आहे. मुंबई महापालिका हे एक क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला एकच आयुक्त पुरेसा आहे. मुंबईचा कारभार एकछत्री व्हायचा असेल तर एकच आयुक्त योग्य आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची गरज नाही, असं शिवसेना खासदार  विनायक राऊत म्हणाले.

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा

तर मुंबईला दोन आयुक्त देण्याची शेख यांची मागणी निंदनीय असून या मागणी आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. पण काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.  (Congress Opposes Aslam Sheikh demand Two BMC Commissioner for mumbai)

संबंधित बातम्या : 

मुंबईला दोन पालिका आयुक्त हवे; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.