Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी, काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बनणार आता महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता?

हाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असणार? याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी, काँग्रेसचा 'हा' बडा नेता बनणार आता महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्षनेता?
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 12:11 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. तसेच अजित पवार हे महाविकास आघाडीचे बडे नेते होते. ते महाविकास आघाडीची ताकद होते. पण त्यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत सत्तेत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात खळबळ उडाली आहे. पण तरीही आता विरोध पक्षांनी सत्ताधारी पक्षांचा ‘करो या मरो’ या धर्तीवर सामना करण्याचं ठरवलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पावसाळी अधिवेशनाआधी विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असेल याबाबत ठरवणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे याचबाबत मोठी बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. सभागृहात आता काँग्रेस आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे संख्याबळ पाहता काँग्रेसचा विरोधी पक्षनेता व्हावा, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची आहे. विशेष म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता तशाच घडामोडी घडणार आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते बनण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण बनणार? याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. काँग्रेसकडून सातत्याने याबाबत दावा केला जातोय. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीत असलेले ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसलाच विरोधी पक्षनेतेपदाची संधी दिल्याची चर्चा आहे. पण याबाबत सध्या तरी अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा सस्पेन्स कायम राहणार की याबाबतची लवकर घोषणा होणार ते आगामी काळात लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.

शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की..
छेडछाडीला कंटाळून तरुणीने लग्नाच्या आधल्या रात्रीच असं काही केलं की...
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू
अबब! घराच्या छतावर आकाशातून पडला 50 किलोच धातू.
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं
उद्धव ठाकरेंकडून कोणत्याही अटी नाही; ठाकरे बंधूंच्या युतीवर राऊतांचं.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊत स्पष्टच बोलले.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी.
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.