AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई

गणेश हंडोरे यांनी आपल्या कारने चेंबूरजवळ दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गोपाळ आरोटे नावाचा तरुण जखमी झाला होता.

काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई
| Updated on: Oct 05, 2024 | 4:59 PM
Share

Chandrakant Handore Son Arrested : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता एक मोठी घटना समोर आली आहे. काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांचा मुलगा गणेश हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडी पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोवंडी पोलिसांनी गणेश हांडोरेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हांडोरे हे ज्यूस पिण्यासाठी गोवंडीत गेले होते. गोवंडीहून पुन्हा परतत असतानाच त्यांनी चेंबूरमधील आचार्य कॉलेजजवळ एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गोपाळ आरोटे याला दुखापत झाली. यानंतर गोपाळ आरोटेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करताच गणेश हांडोरेने घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर गोपाळ यांची शुगर वाढली. त्यांना जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयात उपचार सुरू

शुक्रवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान हा अपघात घडला. यानंतर गोवंडी पोलीस ठाण्यात गणेश हांडोरेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर गोवंडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आता गणेश हांडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर गणेश हांडोरे यांच्या कारच्या धडकेत जखमी झालेले गोपाळ आरोटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या याप्रकरणी गोवंडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

चंद्रकांत हंडोरे यांचा अल्पपरिचय

दरम्यान चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. १९८५ ला चंद्रकांत हंडोरे हे पहिल्यांदा मुंबईत नगरसेवक म्हणून निवडून आले. तर १९९२-९३ साली ते मुंबईचे महापौर होते.

काँग्रेसमध्ये एक आंबेडकरी चळवळीतील नेता अशी त्यांची ओळख आहे. चेंबूर मतदारसंघातून ते २००४ ला आमदार झाले. विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांची मंत्रीपदही वर्णी लागली. सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी अनेक कामे केली. २००९ मध्ये दुसऱ्यांदा ते आमदार झाले, मात्र त्यानंतर बदललेली काँग्रेस आणि बदलेलं राजकारण यात हंडोरे मागे पडले. त्यातच विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाल्याने ते अधिकच नाराज झाले. मात्र यानंतर काँग्रेसने त्यांचं पुनर्वसन करत त्यांना राज्यसभेचे खासदार बनवलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.