काँग्रेसचा आसूड कडाडणार, ‘शेतकरी-मजूर बचाओ’ आंदोलनाची हाक

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यात काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल. congress will protest against maharashtra against agriculture acts

काँग्रेसचा आसूड कडाडणार, 'शेतकरी-मजूर बचाओ' आंदोलनाची हाक

मुंबई: केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि संसदेचे नियम पायदळी तुडवून शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर करुन त्याचे कायदे बनवले. या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. (congress will protest against maharashtra against agriculture acts)

काँग्रेसने केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात भूमिका घेतली आहे. काँग्रेसकडून देशभरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शुक्रवारी राज्यात शेतकरी मजूर बचाओ दिवस पाळण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात लासलगाव जि. नाशिक येथे आंदोलनात सहभागी होतील. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे बैलगाडी लाँग मार्च आयोजित करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड हे मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहेत.

गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव हिंगोली येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या नेतृत्वाखाली वर्धा, नंदूरबार येथील महात्मा गांधी पुतळ्या समोर आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर येथील गांधी चौकात काळ्या कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत.  गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे कोल्हापूर, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली मार्केट यार्ड  येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

राहुल गांधींना धक्काबुक्की; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचा संताप, निदर्शने

Rahul Gandhi Hathras Live Update | “इंदिरा का पोता है, राजीव का बेटा है, न डरेगा और न ही रुकेगा”

(congress will protest against maharashtra against agriculture acts)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI