AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे रुळावर मांडली होती चूल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागी झाली रेल्वे यंत्रणा

मुंबईतील रेल्वे सेवा देशातील सर्वात व्यस्त रेल्वे सेवेपैकी आहे. दररोज लाखो लोकं मुंबईत या रेल्वेची सेवा घेत असतात. कधी जर रेल्वे सेवा विस्कळीत झाले तर लाखो लोकांना याचा फटका बसतो. त्यातच आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये काही लोकं रेल्वेच्या रुळावर चूल लावून बसल्याचे दिसत आहे.

रेल्वे रुळावर मांडली होती चूल, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खडबडून जागी झाली रेल्वे यंत्रणा
| Updated on: Jan 26, 2024 | 5:32 PM
Share

Mumbai local : मुंबईतील रेल्वे सेवा ही जीवन वाहिनी म्हटली जाते. कारण दररोज रेल्वेने लाखो लोकं प्रवास करत असतात. लाखो प्रवासी दररोज लोकलने कामाला जातात. मुंबईतील लोकलची गर्दी ही जगभरातील लोकांसाठी आश्चर्याचे केंद्र ठरते. कारण इतक्या गर्दीतून प्रवास करणे सगळ्यांना शक्य नाही. रेल्वे सेवेत कधी काही बिघाड झाला तर मुंबईतील लोकांचे जीवन विस्कळीत होऊन जाते. इतकी रेल्वे ही मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे. पण याच लोकल रेल्वेवर जेव्हा लोकं अन्न शिजवू लागतात तेव्हा याचा धोका देखील होऊ शकतो. एका व्हायरल व्हिडिओ नंतर ही धक्कादायक बाब पुढे आली आहे. मुंबईतील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत काही लोक रेल्वे रुळांच्या मध्यभागी बसून जेवण बनवत आहेत. कोणीतरी याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @mumbaimatterz नावाच्या पेजने शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये हे दृश्य माहीम जंक्शनच्या रेल्वे स्टेशन जवळील असल्याचे म्हटले आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. जो 24 जानेवारी रोजी पोस्ट करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर मुंबई विभाग-मध्य रेल्वेपर्यंत पोहोचला. त्यांनी डीआरएम पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाला तपासाच्या सूचना दिल्या. डीआरएमने आरपीएफ मुंबई सेंट्रल विभागाला टॅग केले आणि त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर आरपीएफने ट्विट करून माहिती दिली की, ‘आरपीएफ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी यांना रेल्वे परिसरातून हटवले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.