AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान

राज्याची राजधानी मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा बिल्डिंगमध्येच कोरोनाचा जास्त फैलाव होत असल्याचं समोर आलं आहे (Corona infection in Mumbai increases ).

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान
मुंबई महापालिका
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 15, 2020 | 10:55 AM
Share

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा बिल्डिंगमध्येच कोरोनाचा जास्त फैलाव होत असल्याचं समोर आलं आहे (Corona infection in Mumbai increases ). मागील 12 दिवसांमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये वेगाने ‘प्रतिबंध’ वाढले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या सध्या 8 हजार 637 वर पोहचली आहे. तर सीलबंद चाळी-झोपडपट्ट्यांची संख्या 557 इतकी आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा इमारतींमध्येच कोरोनाचा फैलाव सर्वाधिक असल्याचे समोर आलं आहे. 1 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत फक्त 12 दिवसांमध्ये इमारतीमधील कंटेनमेंट झोनची संख्या तब्बल 2334 इतकी वाढून 8637 वर पोहोचली आहे. झोपडपट्ट्या-चाळींमध्ये मात्र प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 20 ने कमी होऊन 557 झाली आहे. त्यामुळे बड्या सोसायट्या आणि इमारतींमध्ये कोरोना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर निर्माण झाले आहे.

दरम्यान, विना मास्क फिरणारे नागरिक आणि मंडईतील भाजीविक्रेत्यांमुळे मुंबईत कोरोना संसर्ग वाढण्यात भर पडत असल्याचाही आरोप होत आहे. पालिका वारंवार मास्क घाला, अशी विनंती करुनही नागरिक याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. मास्कसाठी मुंबईकरांना दंड सुद्धा आकारला जातो, पण भाजी मंडईत विक्रते मास्क घालताना दिसत नाहीत. भाजी विक्रत्यांचा नागरिकासोबत थेट संपर्क येत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाचं भान येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पुन्हा घसरु लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा दिवसात डबलिंग रेट 84 वरुन 58 दिवसांवर आला आहे. एकीकडे मुंबईत दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरु लागला आहे. म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वेगाने दुप्पट होऊ लागले आहेत. तर रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे.

गेल्या काही महिन्यात कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र अवघ्या दहा दिवसात तो घसरुन तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी 67 दिवस होता.

गेल्या महिन्याभरात मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवे रुग्ण सापडत होते. मात्र आता 2000 हून अधिक नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती कोरोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. यामुळे मुंबई महापालिकेपुढे आव्हान उभे राहिले आहे.

मुंबईतील कोरोना वाढती रुग्ण संख्या

तारीख – रुग्ण संख्या – मृत्यू

13 सप्टेंबर – 2081 – 41 12 सप्टेंबर – 2321 – 42 11 सप्टेंबर – 2172 – 44 10 सप्टेंबर – 2371 – 38 9 सप्टेंबर – 2227 – 43

तर दुसरीकडे मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. तसेच मुंबईतील रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.20 टक्के झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत बेडची संख्या ही कमी होत चालली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे ही लक्ष द्यावं, असं मत विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केलं आहे. (Reason Behind Mumbai Corona Patient Increase Again)

संबंधित बातम्या : 

मुंबईत नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढतोय, रुग्णवाढीची कारणं काय?

Mumbai Dabbawala | डबेवाल्यांच्या प्रश्नी मानवाधिकार आयोगाचे मुख्य सचिवांना समन्स

डोक्याला दुखापत, कंबरेपाशी चिरफाड, नंतर मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप

संबंधित व्हिडीओ :

Corona infection in Mumbai increases

Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप