4 दिवसांचं बाळ, दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एका आयाला कोरोना, वसई-विरारमध्ये 13 नवे रुग्ण

वसई-विरार हे कोरोनाचं नवं हॉटस्पॉट (Vasai Virar Corona hotspot) बनत चाललं आहे. कारण वसईत आज आणखी 13 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

4 दिवसांचं बाळ, दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एका आयाला कोरोना, वसई-विरारमध्ये 13 नवे रुग्ण

विरार : वसई-विरार हे कोरोनाचं नवं हॉटस्पॉट (Vasai Virar Corona hotspot) बनत चाललं आहे. कारण वसईत आज आणखी 13 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माता-बाल संगोपन केंद्रातले 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले (Vasai Virar Corona hotspot) आहेत. त्यामध्ये 5 कर्मचारी, 2 नर्सचा समावेश आहे. तर 4 दिवसांचे बाळ आणि वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय इतर 6 रुग्ण अन्य रुग्णांच्या संपर्कातील आहेत.

त्यामुळे वसई-विरार परिसरात कोरोना बाधितांच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज ज्या 13 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या जूचंद येथील माता बाल संगोपन केंद्रातील 7 जणांचा समावेश आहे. यात दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एक आया तसेच उपचारासाठी आणलेल्या 4 दिवसाचं बाळ आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. इतर 6 रुग्ण हे पूर्वीच्या कोरोना बाधित रुगणाच्या संपर्कातील आहेत.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर नायगाव पूर्व जूचंद येथील माता बाल संगोपन केंद्र सील करण्यात आले आहे. या नव्या 13 रुग्णांस वसई विरार क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80 वर पोहोचली आहे. आतापर्यंत चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नौदलात कोरोनाचा शिरकाव 

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने आता भारतीय नौदलातही शिरकाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Infection in Naval Shore). मुंबईत भारतीय नौदलाच्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग झालेल्या सैनिकांवर उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गानंतर नौदलाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण

राज्याच्या आरोग्य विभागाने काल १७ तारखेला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3320 वर पोहोचली आहे (Total Corona Patient in Maharashtra).  राज्यात आतापर्यंत 331 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Total Corona Patient in Maharashtra).

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर 3320 जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या  

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर   

भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग  

Published On - 1:56 pm, Sat, 18 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI