‘त्या’ इमारतीतील कोरोना रुग्णांचा घर क्रमांक सूचना फलकावर लिहिणं बंधनकारक; पालिकेचे आदेश

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण सोसायट्यांमध्ये आढळले आहेत. (Coronavirus cases increase in Mumbai's high-rises apartments)

'त्या' इमारतीतील कोरोना रुग्णांचा घर क्रमांक सूचना फलकावर लिहिणं बंधनकारक; पालिकेचे आदेश
bmc
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 6:29 PM

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण सोसायट्यांमध्ये आढळले आहेत. सोसायट्यांमध्ये 90 टक्के तर झोपडपट्ट्यांमध्ये 10 टक्के कोरोना रुग्ण आढळले असल्याची धक्कादायक माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे पालिकेने, गृह विलगीकरणसह कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला कळवावी, असे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर तात्काळ पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही पालिकेने सर्व विभाग कार्यालयांना दिले आहेत. (Coronavirus cases increase in Mumbai’s high-rises apartments)

मुंबई महानगरातील कोविड-१९ विषाणू बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसात बाधित रुग्णांची दैनंदिन संख्या पुन्हा एक हजारावर पोहोचू लागली आहे. ही संख्या रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कठोर उपाययोजना सुरु केल्या आहेत. केंद्रीय पथकाने देखील मागील आठवड्यात मुंबईतील एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभाग क्षेत्रांमध्ये दौरा करून पाहणी केली होती.

इमारतींमध्ये सक्तीच्या उपाययोजना

दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांपेक्षा रहिवासी इमारतींमधील रुग्ण संख्या तुलनेने जास्त असल्याने अशा निवासी इमारतींमध्ये नियम मोडलेले आढळल्यास सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यात एकूण 23,002 रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आढळले. पैकी सुमारे 90 टक्के रुग्ण हे निवासी इमारतींमध्ये राहणारे आहेत. तर उर्वरित म्हणजे सुमारे 10 टक्के हे झोपडपट्टी व तत्सम वस्तीत राहणारे आढळले आहेत. त्यामुळे इमारतीत सक्तीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

पोलिसात गुन्हे दाखल करा

कोविड-१९ विषाणू संक्रमणाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक असल्याने ज्या निवासी इमारतींमध्ये पाचपेक्षा जास्त बाधित रुग्ण आहेत, अशा गृहनिर्माण संस्थांमध्ये सूचना फलकांवर संबंधित घराचा आणि मजल्याचा क्रमांक दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित रुग्ण तसेच त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या हातावर गृह विलगीकरणाचे शिक्के मारण्यात येणार आहेत. गृह विलगीकरण नियम मोडून असे रुग्ण व त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती घराबाहेर पडले तसेच सार्वजनिकरित्या फिरताना आढळल्यास शेजारील रहिवाशांनी आणि संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ महानगरपालिका प्रशासनाला कळवावे. तसेच विभाग कार्यालयांनी अशा नियम मोडणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

मुंबईत 2,762 मजले सील

दरम्यान, ज्या रहिवासी इमारतीत पाचपेक्षा कमी रुग्ण आहेत, तिथे संबंधित रुग्ण असलेला मजला प्रतिबंधित (सील) केला जातो. दिनांक 9 मार्च 2021 पर्यंतची स्थिती पाहता, मुंबईत एकूण 2,762 मजले प्रतिबंधित (सील) करण्यात आले आहेत. या सर्व मजल्यांमध्ये मिळून 4 हजार 183 रुग्ण आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण असल्यास संपूर्ण निवासी इमारत प्रतिबंधित केली जाते. मुंबईत अश्या 214 इमारती आहेत, असं पालिकेने म्हटलं आहे.

कोविड चाचण्यांची संख्या वाढवणार

एकाच घरामध्ये बाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती गृह विलगीकरणात राहत असतील तर रुग्ण आणि कुटुंब यांच्यासाठी स्वतंत्र खोली तसेच स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. अशी व्यवस्था घरी उपलब्ध नसल्यास त्यांना विलगीकरण केंद्रांमध्ये नेण्यात येईल. बाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी गृह विलगीकरणात मुखपट्ट्या (मास्क) वापरणे, निर्जंतुकीकरण द्राव्य (सॅनिटायझर) चा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. बाधित रुग्ण संख्या अधिक आढळलेल्या रहिवासी इमारतींमध्ये वावरणारे मोलकरीण, मजूर, वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेते, कार्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांची कोविड चाचणी करण्यात येत आहे. अशा चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत.

कोविड सेंटर कार्यान्वित

प्रतिबंधित निवासी इमारतीमधील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची, त्यांच्यात लक्षणे आढळली नाहीत तरीही, संपर्कात आल्यापासून सातव्या दिवशी चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे जास्तीत जास्त संस्थात्मक अथवा गृह विलगीकरण करून विषाणूची साखळी तोडण्यावर भर दिला जात आहे. गृह विलगीकरण नियमाचे पालन करत नसलेल्या व्यक्तींना सक्तीने कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी 1) मध्ये स्थानांतरीत केले जात आहे. त्यासाठी सर्व विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कोरोना काळजी केंद्र व्यवस्था पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहितीही पालिसेने दिली आहे. (Coronavirus cases increase in Mumbai’s high-rises apartments)

संबंधित बातम्या:

 राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण

तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्राची स्थिती धोकादायक वळणावर, राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत

(Coronavirus cases increase in Mumbai’s high-rises apartments)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.