Corona first anniversary Pune Maharashtra : राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. या घटनेला आज बरोबर एक वर्ष झालं.

Corona first anniversary Pune Maharashtra : राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण
corona virus news
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 6:40 PM

पुणे : राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आला. या घटनेला आज बरोबर एक वर्ष झालं. जवळपास गेली 10 महिने पुणे हे कोरोनाचा हॉटस्पॉट असलेलं शहर होतं. मागच्या महिन्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं, अन पुणे शहर परत लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट (Special report on Corona first anniversary Pune Maharashtra).

राज्यात कोरोनाचा शिरकाव होऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला होता. तो दुबईहून पुण्यात आला होता. गेल्या वर्षभरात कोरोनामुळे पुणे जिल्ह्यात तब्बल 9 हजार 316 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जिल्ह्यात 4 लाख 20 हजार 877 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी 3 लाख 97 हजार 588 जण कोरोना मुक्त झालेत. आजच्या दिवशी (9 मार्च) पुणे जिल्ह्यात 1 हजार 412 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

वर्ष उलटूनही कोरोनाचा उद्रेक कायम

पुण्यातील एक दाम्पत्य दुबईवरून आल्यानं नायडू रुग्णालयात आलं होतं. नेहमीप्रमाणे ओपीडी सुरु होती. राज्यात कोरोनाचा शिरकाव नसल्यानं त्यावेळी फारसं गांभीर्य नव्हतं. मात्र, पुण्यातील दुबईवरून आलेल्या दाम्पत्याला विना मास्क आणि पीपीई किट नसतांना तिथल्या डॉक्टरांनी तपासलं. सरकारी नियमावलीनुसार त्यांचे स्वँबही घेतले गेले. मात्र, दुसऱ्या दिवशी दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.

वर्षपूर्तीनंतर आजही अनेक जणांकडून हलगर्जीपणा

नायडू हॉस्पिटलमधील डॉ. अरविंद परमार यांनी राज्यातील या पहिल्या कोरोना रुग्णांवर उपचार केले होते. डॉ. परमार यांनी आजपर्यत जवळपास 15 हजार कोरोना रुग्णांवर उपचार केलेत, पण आजही अनेक जण हलगर्जीपणा करत असल्याचं डॉ. परमार सांगतात. अशा काही लोकांच्या चुकीमुळे कोरोना वाढत असल्याचंही ते नमूद करतात.

पुणे शहरात नाईट कर्फ्यू

पुण्यात वर्ष उलटत असतांना कोरोनाची परिस्थिती हादरून टाकणारी आहे. त्यामुळे शहरात नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. शाळा महाविद्यालय बंद करण्यात आलीत. येत्या शुक्रवारी या निर्बंधांमध्ये अधिक वाढ होण्याची किंवा लॉकडाऊन होण्याचीही शक्यता आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सूचक विधान केलंय.

पुण्यात राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला असला तरी त्याच पुण्यात कोरोना लसीचं उत्पादनही होत असल्यानं काहिसा दिलासा मिळत आहे. असं असलं तरी पुणेकरांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.

हेही वाचा :

पुण्यातील कोरोना टेस्ट करणाऱ्या तीन लॅब सील, कारण काय?

पुण्यात कोरोना संसर्ग वाढला, निर्बंधाबाबत अजित पवार लवकरच निर्णय घेणार

पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

व्हिडीओ पाहा :

Special report on Corona first anniversary Pune Maharashtra

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.